Shivendra Raje Bhosale vs Shashikant Shinde : सातारा जिल्हा बँक निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला होता. या पराभवाला शिवेंद्रराजे भोसले आणि  रामराजे नाईक निंबाळकर यांचं पॅनल असल्याचा आरोप करण्यात येत होता. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केलं होतं. त्याशिवाय हिशोब वेळीच चुकता करु असेही म्हटलं होतं. हिशोब चुकता करायला मी कधीही तयार, आहे असं म्हणत शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याला शिवेंद्रराजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


 ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयी कार्यक्रमावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. शशिकांत शिंदे यांच्या अपयशात माझा संबंध नसल्याचे सांगत शशिकांत शिंदे यांना माझा हिशोब चुकता करायचा असेल तर मी कधीही तयार असल्याचे शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितले. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, ‘तुमच्या बगलबच्च्यांच्या उद्योगांमुळेच तुमचा पराभव झालाय. त्यांना तुम्ही आवरलं असतं तर तुमचा पराभव झाला नसता. आम्हाला हिशोब चुकता करायच्या धमक्या देऊ नका. हिशोब चुकता करायची वेळ आली तर आम्ही पण साता-यातच जन्मलोय. तुमच्या मुंबईच्या गुंडांना आमचा हिशोब परवडायचा नाही.’  सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मला पाडण्यात शिवेंद्रराजे भोसले यांचा हात आहे. यामध्ये त्यांना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी मदत केली, असा दावा शशिकांत शिंदे यांनी पराभवानंतर केला होता. शशिकांत शिंदे यांच्या आरोपांवर शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



संबधित बातम्या :


शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादीच्या काहींनी रसद पुरवली, पॅनलकडून विश्वासघात, शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप 
साताऱ्यात राडा, शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचंच कार्यालय फोडलं
Satara Elections:दुसऱ्यावर पराभवाचं खापर फोडणं फार सोप्पं असतं,शिवेंद्र राजेंचा शशिकांत शिंदेंना टोला
शशिकांत शिंदेंनी जिल्हा बँकेची निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती; शरद पवारांनी उपटले कान