Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी छापेमारी केली. सकाळी सुरु झालेली छापेमारी मध्यरात्रीपर्तंयत सुरु होती. ईडीने तब्बल 18 तास खोतकर यांच्या घरी छापेमारी करत तपासणी केली. आजही खोतकरांच्या संपत्तीवर छापेमारी होणार आहे. शुक्रवारी ईडीने खोतकर सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तपासणी करण्यात आली. 12 जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली.
ईडीकडून शुक्रवारी सकाळी सुरु असलेली छापेमारी रात्री दोन वाजेपर्यंत सुरु होती. अर्जुन खोतकर यांच्या घरावर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पथकाकडून छापेमारे करण्यात आली. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वरून ईडीकडून शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून ही कारवाई सुरु आहे. आजही ईडीच्या पथकाकडून तपास करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याचं समजतेय. जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले होते आरोप. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली.
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे काय होते आरोप?
2012 साली टेंडर काढण्यात आले. नुसत्या जमिनीची रेडीरेकनर व्हॅल्यू 70 कोटी रुपये असताना व्हॅल्यूअरला मॅनेज करून संपूर्ण कारखान्याची लँड, प्लॉट, आणि मशनरी प्राईस फक्त 42 कोटी ठेवण्यात आली.
महाराष्ट्र सरकारचे शंभर एकर जमीन एम एस सी बँकेकडे नसतानासुद्धा विकण्यासाठी काढली, खोतकर यांच्या संबंधित तीन कंपन्यांनी यासाठी टेंडर भरले.
औरंगाबाद मध्ये छापा टाकण्यात आलेल्या एका उद्योजकाचे आणि व्यावसायिकाचे खोतकर यांच्यशी साखर कारखान्याच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध असल्याचा सोमय्याचा आरोप.
औरंगाबाद मधील एका उद्योजकाने 43 कोटींचा कारखाना अर्जुन खोतकर यांच्या अर्जुन सीडस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला 27.58 कोटी रुपयांना विकला..असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha