स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरे आणि इतर संस्थांची स्पर्धा घेतल्या नंतर यावेळी केंद्र सरकारने प्रथमच ग्रामीण भागासाठी हे सर्वेक्षण घेतलं. यात विविध निकषांमध्ये सातारा जिल्हा हा देशात सर्वप्रथम ठरलाय.
हागणदारी मुक्त गाव या योजनेमध्ये साताऱ्याला अधिक चांगली कामगिरी करून दाखवली होती. याशिवाय ग्रामीण भागांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणा राबवलं गेलं, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी बचत गटांना प्रोत्साहन असे अनेक प्रयोग प्रशासनाच्या वतीने राबवले गेले त्याचाच परिणाम म्हणून आज संपूर्ण देशभरात प्रथम क्रमांक पटकाव त्याचा मान मिळाला अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी व्यक्त केली.
तर या उपक्रमांमध्ये लोकांची ही साथ महत्त्वाची होती, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ही जिल्ह्यांना पहिल्यापासून सरस कामगिरी दाखवलेली आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलं.
दरम्यान, देशातील टॉप-100 स्वच्छ जिल्ह्यांमध्ये एकट्या महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा टॉप-10 मध्ये समावेश आहे. सातारा, नाशिक आणि सोलापूर हे तीन जिल्हे टॉप-10 मध्ये आहेत. या जिल्ह्यांचाही आज गौरव करण्यात आला.