Satara Crime News : सातारा (Satara) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील शिरवळमध्ये एकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांकडून भर रस्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. भर दिवसा घडलेल्या घटनेने शिरवळ परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे.

Continues below advertisement

सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारामध्ये रियाज उर्फ मन्या इकबाल शेख जखमी झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. जुन्या वादातून रियाजवर गोळीबार झाल्याची प्रार्थमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस हल्लेखोरांच्या शोध घेत आहेत. दरम्यान, सध्या खुनाचा बदला खुनाने हा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. पुण्यातील घटना ताजी असतानाच साताऱ्यातील शिरवळ मध्ये एकावर गोळीबार करण्यात आला आहे. 

गोळीबार करणाऱ्या दोघांचा शिरवळ पोलीसांकडून शोध सुरु  

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 2016 मध्ये प्रतीक चव्हाण याचा खून करण्यात आला होता. याचाच बदला घेण्यासाठी रियाजवर गोळीबार करण्यात आला असल्याची चर्चा आता शिरवळमध्ये सुरू झाली आहे. जुन्या वादातून रियाज वर गोळीबार झाल्याची चर्चा सुरू आहे या गोळीबारामध्ये रियाज शेख हा किरकोळ जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या दोघांचा शोध शिरवळ पोलीस घेत आहेत. 2016 मध्ये प्रतीक चव्हाण याचा खून करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी म्हणून रियाज शेखला अटक करण्यात आली होती. 2018 मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. वाई कोर्टामध्ये केस सुरू आहे. आता  त्याच्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Continues below advertisement

पुण्यात 5 सप्टेंबरला एकाची हत्या

5 सप्टेंबर रोजी पुण्यात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बंडू आंदेकर याचा जावई आणि वनराज आंदेकर यांच्या खुनातील प्रमुख आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा गोविंद ऊर्फ आयुष कोमकर (18) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रात्री पावणे आठच्या सुमारास दोघांनी गोविंद ऊर्फ आयुष कोमकर याच्यावरती तीन गोळ्या झाडून निर्घृण खून केला. गोविंद त्याच्या नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये उभा असताना हा हल्ला झाला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी घडलेल्या या खळबळजनक घटनेमुळे नाना पेठ परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण पसरले होते. आता त्यामनंर साताऱ्यातील शिरवळमध्ये देखील भरदिवसा गोळीबार करण्यात आल्याची घटनमा घडल्यानं खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ayush Komkar : क्लासवरून येऊन पार्किंगमध्ये थांबला अन् घात झाला, वनराज आंदेकरचा भाचा आयुषचा गोळ्या झाडून खून, अजित पवारांनी पोलिसांना दिले आदेश