Vishwas Patil :  छत्रपती संभाजी महाराजांवरील संभाजी ही कादंबरी मी घरा घरात पोहोचवली आहे. लिखाण करुन करुन माझे हात वाकडे झाले आहेत, असे वक्तव्य अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil ) यांनी केलं. पुण्यात आयोजीत करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. मी जातीवर बोललो नव्हतो. मी संभाजीराजे मद्य सेवन करत होते असं कधीही म्हटलं नाही असे विश्वास पाटील म्हणाले.  त्यावर मी वीडियो पण बनवला आहे मी असं काहीही म्हटलं नसल्याचे स्पष्टीकरण विश्वास पाटील यांनी दिले.  

Continues below advertisement

संभाजी कादंबरी मी घरा घरात पोहोचवल्याचे मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. लिखाण करुन करून माझे  हात वाकडे झाले आहेत असेही ते म्हणाले. आज मला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. आमचे गुरु प्र के अत्रे असतील अशा लोकांच्या गादीवर बसण्याचा मान मिळाला. मला आवडलेली लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी आहे. मी आतापर्यंत 25 वर्ष झालं लिहीत आलो आहे असे विश्वास पाटील म्हणाले. 

मी वारणा काठचा पण वारणा काठचेच काही लोक माझी बदनामी करतायेत

मी सर्व प्रकारचे साहित्य लिहले आहे. लोकप्रिय साहित्य लिहले हा आरोप चुकीचा आहे. मी अण्णाभाऊ साठेंवर देखील लिहीलेले आहे. माझे आरक्षणाबद्दलचे वक्तव्य विपर्यास करुन दाखवण्यात आले आहे. मी आरक्षण विरोधी नाही असेही विश्वास पाटील म्हणाले. हैदराबाद गॅझेटचा आरक्षण देताना संदर्भासाठी उपयोग केला जायला हवा. माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. मी लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी लिहली. त्यातून दुखावलेल्या माफियांनी माझ्या कुटुंबीयांना हाताशी धरुन बदनामी केली. बदनामी करणाऱ्यांना आव्हान आहे की तो लेख पुन्हा छापावा‌. मी वारणा काठचा आहे. पण वारणा काठचेच काही लोक माझी बदनामी करत असल्याचे विश्वास पाटील म्हणाले. मला कोणी डावं उजवं शिकवू नये. मी पण डावा आहे. मी पाटलाचा पोर आहे, घाबरत नाही, लढायला तयार आहे असे विश्वास पाटील म्हणाले. 

Continues below advertisement

पुण्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेली त बोलत होते. पुण्यातील साहित्य परिषदेच्या सभागृहात त्यांचा सत्कार समारंभ  पार पडला. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे आणि साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ सोहळा संपन्न होत आहे.