सातारा : साताऱ्यातल्या कराडमध्ये काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील आणि विलासकाका उंडाळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. या वादावादीत पाटील यांच्या सुरक्षारक्षकाने धमकावण्यासाठी पिस्तुल काढल्याचा आरोप होत आहे.


आमदार आनंदराव पाटील पैसे वाटत असल्याचा आरोप करत उंडाळकर समर्थकांनी पाटील यांच्या गाड्या अडवल्या. यातून झालेल्या वादातून दोन्ही बाजूंचे समर्थक एकमेकांना भिडले.

हाणामारीला सुरुवात झाली आणि आनंदराव पाटील यांच्या अंगरक्षकालाही धक्काबुक्की करण्यात आली. त्याचवेळी अंगरक्षकाने पिस्तुल काढल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार आहे.