Satara Udayanraje On Maharashtra Politics : सध्या राज्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकीय घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. माझ आवडतं चॅनेल टॉम अँड जेरी आहे. पण सध्या मी ते बघायचे बंद केले आहे आणि ज्या माकड उड्या चालल्या आहेत त्या बघत बसतो. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतो. मजा येते, अशा शब्दात उदयनराजेंनी निशाणा साधना आहे.
पानपट्टीवर बीडी मिळते तशी अवस्था ईडीची झाली
उदयनराजेंनी म्हटलं आहे की, कोण म्हणतंय तो मुख्यमंत्री आहे का? तो आहे का तो आहे का, अशी चर्चा आहे. कोल्हापूरची सभा उत्कृष्ट झाली, लोक भरपूर आली, पण तुमची डिलीवरी काय होती? तर झिरो असं वक्तव्य त्यांनी केलंय. या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत, माझ्या हातात द्या ईडी, मग दाखवतो यांना. ही ईडीची चेष्टा झाली आहे. पानपट्टीवर बीडी मिळते तशी अवस्था ईडीची झाली आहे. लावा ना ईडी. चाप लावा. घ्या ताब्यात सगळे येतील. यांना दांडक्याने सडकून काढले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
उदयनराजेंनी म्हटलं आहे की, एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत, या लोकांना दिसत नाही का? प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची, जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही. दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे. लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही, लोक हसतायत, असं ते म्हणाले. जर निवडणुका लागल्या तर हे कसे उभारणार हे त्यांचे त्यांनाच माहिती, असंही ते म्हणाले. माझ नाव घ्यायचे नाही, मी कुणाच्या नादाला लागत नाही, असंही ते म्हणाले.
कास धरणाचे काम हे येत्या 20 मे पर्यंत संपलेले असेल
गेली चार वर्षापेक्षा जास्त कालावधीत सुरु असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरु असून हे काम यंदाच्या पावसाळ्याआधी पूर्ण होईल का याबाबत सातारकरांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता. सध्याच्या कामाची स्थिती काय आहे. सध्याच्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी संबधित विभागाचे अधिकारी यांना उदयनराजे भोसले यांनी बोलावून मिटिंग केली. दरम्यान अडचणीवर चर्चा करताना त्यांनी काही अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कास धरणाचे काम हे येत्या 20 मे पर्यंत संपलेले असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.