सातारा : साताऱ्याचा गिर्यारोहक आशिष माने याने जगातील आठवं सर्वोच्च शिखर सर केलं आहे. 8 हजार 163 मीटर उंच माऊंट मनास्लू हे शिखर आशिषने आज पहाटे चार वाजता सर केलं.


आठ हजार मीटर्सपेक्षा जास्त उंच असणाऱ्या चौदा शिखरांपैकी चार किंवा जास्त शिखरांवर यशस्वी चढाई करणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरला आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाने ही चढाई पार केल्याने सर्वत्र आश्चर्य आणि कौतुक केलं जात आहे.

माऊंट मनास्लू

ही बाब जेव्हा साताऱ्यातील गिर्यारोहकांना समजली तेव्हा अनेकांनी त्याच्या वडिलांचे घरी जाऊन अभिनंदन केलं. ही चढाई सुरु असताना ब्रिटनहून आलेल्या एका टीममधील गिर्यारोहकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह खाली आणण्याचं काम काही गिर्यारोहकांकडून सुरु आहे.

या शिखरावर 2012 मध्ये 18 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. तर नंतरच्या काळातही 12 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.