Suresh Dhas : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची आज छत्रपती संभाजी राजे यांच्यासह अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, ज्योती मेटे, सुरेश धस, बीडचे खासदार आमदारांनी भेट घेतली. याबाबत आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांची मागणी एकच होती, की, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील तपासावर परिणाम होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा घ्यावा असे धस म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटत राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे धस म्हणाले. त्यांच्याकडे गृह खाते आहे. 
आम्ही छोट्या माणसांनी त्यांना सांगायची गरज नाही, आमची लायकी नाही असेही ते म्हणाले. 


अजित दादांवर माझा हक्क 


संभाजीराजे यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे धस म्हणाले. स्वपक्षाची कुठेही नाराजी नाही. मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बोलणार आहे. मी मात्र संतोष देशमुखबद्दल बोलणं थांबवणार नाही  असेही धस म्हणाले. अजितदादांवर काय टीका केली, त्यांना लागायचं काय कारण आहे असेही धस म्हणाले.  माझ्याकडून अनवधानाने एक शब्द अरे तुरे केला तो शब्द परत घेतलाय. अजित दादांवर माझा हक्क आहे अरे तुरे बोलण्याचा असेही धस म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत मी फार काळ काम केले आहे. अधिकार वाणीने मी त्यांचा एकेरी उल्लेख केला होता असे सुरेश धस म्हणाले. एक नैतिक जबाबदारी म्हणून अरे तुरेची भाषा करायला नको होती, मी दिलगिरी व्यक्त करतो असेही सुरेश धस म्हणाले. 


वंजारी समाजाच्या 90 टक्के लोकांना हे पटलेले नाही


वंजारी समाजाच्या 90 टक्के लोकांना हे पटलेले नाही. गँग्ज ऑफ वासेपूर यांचाही त्रास मुकादमांना झाला आहे. त्यामुळे वंजारी समाजाचे मुकादम त्रासलेले आहेत असे धस म्हणाले. माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत
त्यांच्या सोबत माझे संभाषण झालेले नाहीत असे धस म्हणाले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्यानंतर मी पुढे जाणारा कार्यकर्ता नाही असेही धस म्हणाले. मी या प्रकरणावर हृदयापासून बोलत आहे. इतर कुठल्याही विषयावर मी बोलत नाही. उद्या बावनकुळे यांचीही भेट घेणार असल्याचे धस म्हणाले. 


नितीन बिकड हा सहआरोपी होऊ शकतो


माझी माध्यमांना विनंती आहे की कदाचित नितीन बिकड हा सहआरोपी होऊ शकतो. आरोपी त्याने सांभाळले आहेत असेही सुरेश धस म्हणाले. आज किंवा उद्या हा बिकड आत जाऊ शकतो.
ज्यांचा रेकॉर्ड आहे, त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही असे धस म्हणाले. माझ्यासोबत फोटो असेल तर प्रसिद्ध करा. याचा अर्थ आम्ही तेवढे जवळ नाहीत, जेवढ्या जवळ हे धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्या जवळ आहेत असेही धस म्हणाले. मी सांगितल्या तारखेला हे तिथे दिसतील.19 जून 2024 मध्ये सातपुडा बंगल्यावर बैठक झाली होती. त्या बैठकीत हा नितीन बिकड होता. ओम साई राम कंपनी कुणाकडे आहे, ते तपासा असेही धस म्हणाले.