Walmik Karad: संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाने राज्यातील राजकीय सामाजिक वातावरण तापलं आहे. गेल्या 13 दिवसांपासून CID च्या पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप होत असून पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. (Santosh Deshmukh Case) याविरोधात वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल झाले असून अजूनही मोका दाखल करण्यात आला नाही. 31 डिसेंबर रोजी शरणागती पत्करलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. बीड पोलीस ठाण्यातून मंगळवारी वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केले जाणार आहे. बंदुकीचा परवाना रद्द केल्यानंतर आणि 13 दिवस कसून चौकशी केल्यानंतर CID च्या तपासात आणखी काय समोर येणार? वाल्मिक कराडच्या कोठडीतला मुक्काम वाढणार की थांबणार? हे महत्वाचं ठरणार आहे.
वाल्मिक कराडला CID कोठडी सुनावण्यात आल्यानंतर बीड शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत त्याला ठेवण्यात आले आहे. तिथे CIDचे दोन अधिकारी कायमस्वरूपी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराडवर शहरातील विविध पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्यास 24 तास ड्यूटी लावण्यात आली आहे. दरम्यान, खंडणी प्रकरणी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी धनंजय देशमुखांची मागणी आहे. वाल्मिक कराडवर हत्येप्रकरणी कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. धनंजय देशमुखांसह मस्साजोगचे ग्रामस्थही मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत.
टॉवरवर चढून सामुहिक आत्मदहनाचा इशारा
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना दिली जात नाही. खंडणीप्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केलं जात नाही. या प्रकरणातील इतर आरोपींना मोक्का लावण्यात आला. पण त्याला मोक्का लावण्यात येत नाही अशी तक्रार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला मोक्का लावा या मागणीसाठी गावकरी बुधवारी दिवशी सकाळी 10 वाजता सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत.संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मस्साजोगचे गावकरी हे एकत्रित जमले आणि त्यांनी बुधवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा: