Ashadhi Wari 2022 : अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची सुरुवात झाली आहे. संत तुकाराम महाराजांपासून ते नामदेव महाराजांपर्यंत साऱ्याच पालख्यांचे प्रस्थान झाले आहे. शेगावहून निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज सोलापुरात आगमन झालं आहे. यावेळी सोलापूरकरांनी अतिशय आनंदी वातावरणात गुलाब पुष्पांची उधळण करून पालखीचे स्वागत केलं आहे.    


संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात गुलाब पुष्पांनी स्वागत 


संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरात पोहोचताच सोलापूरकरांनी अतिशय आनंदी वातावरणात गुलाब पुष्पांची उधळण करून पालखीचे स्वागत केलं आहे. सोलापूर शहरात पालखी दाखल होताच सोलापूर शहर पोलीस प्रशासनाकडून परंपरागत पालखीचं स्वागत करण्यात आलं आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे यंदाचे 53 वं वर्ष आहे.   


पालखीचा आज आणि उद्याचा मुक्काम सोलापुरात 


ऊळेहून निघालेला पालखीचा आजचा आणि उद्याचा म्हणजेच दोन दिवस पालखीचा मुक्काम हा सोलापुरात असणार आहे. यामुळे सोलापूरमधील भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. 


वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण  


कोरोनामुळे गेली दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला होता. मात्र, दोन वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. 


महत्वाच्या बातम्या :