ठाणे : ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना काल फेरिवाल्यांकडून मारहाण झाल्यानंतर आज स्वतः ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.


यावेळी ठाणेकरांना संजीव जयस्वाल यांचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. वाहनं पार्क करून गर्दीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या रिक्षाचालकांना संजीय जयस्वाल यांनी जाब विचारला.

एवढंच नव्हे तर दृश्यांमध्ये संजीव जयस्वाल रिक्षाचालकाची कॉलर पकडून त्याला हुसकावून लावताना दिसले. तर एका कारमध्ये बसलेल्या तरूणाला देखील पोलिसांच्या मदतीने संजीव जयस्वालांसमोर खेचून बाहेर काढण्यात आलं.

आयुक्तांचा हा आक्रमकपणा पाहून ठाणेकर देखील चांगलेच अचंबित झाले. गुन्हा अवैध फेरिवाल्यांनी केला, मग त्याची शिक्षा रिक्षाचालकांना का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

दरम्यान संजीय जयस्वालांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाण्यातल्या अवैध दुकानांवर बुलडोझरही चालवण्यात आला.

संबंधित बातम्या : ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांना 100-150 फेरीवाल्यांकडून जबर मारहाण