Sanjay Shirsath :  दक्षिण मुंबईमध्ये (South Mumbai) आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये अशा संदर्भाने शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. यावर विविध स्तरातून टीका होत आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईकर आहेत त्यांना काही गोष्टी अडचणीच्या ठरल्या असतील. पण आमचा सर्वसामान्य असणारा माणूस पुढची पिढी घडवण्यासाठी आला होता, त्याची काळजी कुणी केली का? असा सवाल शिरसाठांनी केला आहे. दोन दिवसाच्या त्रासाने कोणाचा आयुष्य घडत असेल तर त्याच्यावर टीका करणे योग्य नाही असेही शिरसाठ म्हणाले. 

Continues below advertisement


शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंग्रजीतून पत्र लिहीत दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये किंवा ते स्थलांतर करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत अशी मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रावरून सोशल मीडिया सुद्धामध्ये सडकून टीका होत आहे. कबुतरावेळी हे कुठे गेले होते? मराठी विरोधी मानसिकता दिसून आली, अशा प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठी माणूस एकवटल्याने यांना पोटदुखी झाल्याचा घणाघात केला आहे. 


नेमकं काय म्हणाले मिलिंद देवरा? 


दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणाऱ्या निदर्शने आणि मोठ्या संख्येने होणाऱ्या मेळाव्यांबद्दल मी तुम्हाला खोलवर चिंतेत लिहित आहे. आंदोलन करण्याचा अधिकार हा एक आवश्यक लोकशाही स्वातंत्र्य असला तरी, तो सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या आणि व्यत्ययाशिवाय काम करण्याच्या अधिकारांशी संतुलित असला पाहिजे.दक्षिण मुंबई हे केवळ आपल्या राज्याच्या प्रशासनाचे हृदय नाही तर त्याचे राजकीय आणि आर्थिक मज्जासंस्थेचे केंद्र देखील आहे. इथं महाराष्ट्र सरकारचे सचिवालय (मंत्रालय), विधानसभा, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची कार्यालये तसेच पश्चिम नौदल कमांड आहे. ते वित्तीय संस्था, कॉर्पोरेट मुख्यालय आणि महत्वाच्या पायाभूत सुविधांचे केंद्र देखील आहे ज्यावर लाखो लोक दररोज अवलंबून असतात. जगातील कोणतेही राजधानी शहर आपल्या प्रशासन, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य संस्थांना वारंवार निदर्शनांमुळे अपंग होऊ देत नाही. शांततापूर्ण निदर्शने लोकशाहीचा अविभाज्य भाग असली तरी, त्यांचे स्थान आणि प्रमाण सरकार, नगरपालिका प्रशासन, सुरक्षा दल किंवा खासगी क्षेत्राच्या कामकाजाला कमकुवत करू नये. म्हणूनच मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी दक्षिण मुंबईच्या उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.


महत्वाच्या बातम्या:


Milind Deora: गरजवंत मराठा हक्कांसाठी रस्त्यावर, शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरांचं सीएम फडणवीसांना इंग्रजीत पत्र; म्हणाले, दक्षिण मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये