मुंबई :  आगामी  लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election)  महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)   किमान 35 ते 40 जागा जिंकेल, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एबीपी आणि सी वोटर्सच्या सर्व्हेवर केला आहे. कुबड्यावर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा, अशी टीका देखील संजय राऊतांनी (Sanjay Raut)  केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुंबईत हे वक्तव्य केले आहे.  


वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची बैठक उद्या होणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar)  सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हुकूमशाही बळकट होईल असा कुठलाही निर्णय आंबेडकर घेणार नाहीत. लवकरच महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये बैठक होणार आहे.प्रकाश आंबेडकर आणि आमच्या भुमीकेत फरक नाही.  राहुल गांधी यांच्या बैठकीत सुद्धा त्यांच्या संदर्भात विषय काढला गेला. मला असं वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत सामावून घेण्यात विरोध आहे. 


राम मंदिराचा सातबारा भाजपच्या नाही तर रामाच्या नावावर : राऊत 


रामलल्लाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते मत मागतात. राम लल्लाच्या मंदिरासाठी जर कोणी मोठे दान दिलं असेल तिथे शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी एक कोटी रुपये त्यावेळी दिले. त्या ठिकाणचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे भाजपच्या नावावरती नाही, असे राऊत म्हणाले.  


सीमेवरील जवान सुरक्षीत नाही : राऊत 


संजय राऊत म्हणाले.  काश्मीरमधील जी परिस्थिती सध्या दाखवली जाते तशी नाहीये हे मी मानतो. आज सुद्धा काही हत्या झाल्याची माहिती मिळाली. पूछमध्ये हल्ला झाला पाच जवान शहीद झाले. आपले जवान सुरक्षीत नाही पोलिसांची हत्या होत आहे.  त्यामुळे काश्मीर सुधारलं हे कोणत्या आधारावर सरकार म्हणत ?आहे हा प्रश्न विचारणे बरोबर आहे.


इंडिया आघाडीतील सर्व नेते उद्धव ठाकरेंना मानतात : राऊत


इंडिया आघाडीतील सर्व नेते उद्धव ठाकरेंना मानतात त्यांचा आदर करत आहेत अदानी यांच्या विरोधात अनेक जण बोलतात पण त्यांच्या विरोधात मोर्चा उद्धव ठाकरेंनी काढला. राहुल गांधीनंतर कोणते नेते देशात असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत जे लढाई लढत आहेत, असे राऊत म्हणाले. 


सलीम कुत्ताच्या सगळ्या पार्टीच्या संदर्भातील पुरावे दिले आहेत. भाजपाला व्यसन जडले पुरावे द्या पुरावे म्हणायचे.  किती पुरावे द्यायचे तपास सुरू आहे. त्या पार्टीचा आयोजन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं तोच निमंत्रक असल्याचे म्हटले जाते. त्या पार्टीतील भाजप सदस्यांची देवेंद्र फडणवीस सोबतचे फोटो काल मी दाखवले आता याला काय पुरावा लागतो का तुम्हीच आता पुरावा द्यायचा आहे