मुंबई : ज्यांना बाळासाहेबांनी विरोध केला त्या सगळ्यांसोबत ते युती करतील असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटावर (Thackeray Group) केला. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला सत्ता मिळवून देण्याचं काम समाजवादी नेत्यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे न राहता मोदीमय झाल्याची टीका संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द तरी माहीत आहे का? मुख्यमंत्र्यांना समाजवादाची व्याख्या विचारा. त्यांना बाळासाहेब आणि समाजवादी नेते यांचे काय संबंध होते ते विचारा.त्यांना विचारा नाथ पैचं नाव ऐकलं आहे का ? मधु दंडवते यांच नाव माहीत आहे का? ज्या ठाण्यातून ते येतात त्या भागात जास्त समाजवादी लोक राहतात. भाजपच्या पदराखाली बसले आहेत त्यांना सत्ता देण्याचे काम हे समाजवादी नेत्यांनी दिलं.
मुख्यमंत्री हे शिवसेनेचे राहिले नाहीत ते मोदीमय झाले : संजय राऊत
गुजरातमध्ये क्रिकेट समान्याला हरकत नाही मात्र तिथे त्यांच्यावर फुलं उधळली गेली. योद्धे आल्यासारखं अहमदाबादच्या स्टेडीअममध्ये फुलं उधळण्यात आली . इतर राज्यात झालं असतं तर थयथयाट केला असता. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे राहिले नाहीत ते मोदीमय झाले आहेत. भाजपाचे लोक जेवढा मोदी मोदी करत नाहीत तितका अजित पवार आणि एकनाथ शिंदे करत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
आम्हला मिलावट राम म्हणता तुम्ही सडलेली भेळपुरी
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र तोडण्याची भाषा कधी समाजवाद्यांनी केली नाही.ती संघ परिवाराने केली आहे .ज्यांच्यासोबत तुम्ही सध्या आहात. तुम्ही ग्रंथालयाचा जुना रेकॉर्ड तपासून पाहा आणि समाजवाद काय आहे हे समजून घ्या.एकनाथ शिंदे यांनी महापालिकेचा रेकॉर्ड तपासावा ज्या पालिकेवर मराठी माणसाचा पुसून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्या मराठी पालिकेचा कारभार मराठीत भाषेत आणावा हा पहिला प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस यांनी आणला. तुम्ही आम्हला मिलावट राम म्हणतात तुमची सडलेली भेळपुरी झाली आहे तुम्ही आम्हाला समाजवाद काय शिकवणार असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा राज्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे ही मिलावट भाजपमध्ये कशी आहे.
बाळासाहेब हे सर्वसमावेशक होते
बाळासाहेबांनी कोणालाही दूर ठेवलं नाही. बाळासाहेब हे सर्व समावेशक होते. बाळासाहेब जेव्हा हयात होते तेव्हा एकनाथ शिंदे हे सेनेच्या मुख्य वर्तुळात कधीच नव्हते. मी बाळासाहेंबासोबत चाळीस वर्षे काम केले आहे .त्यामुळे बाळासाहेब कोणाला दूर ठेवायचे हे माझ्याशिवाय कोणाला माहित असेल असं वाटत नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले.