Sanjay Raut on Devendra Fadnavis: जलजीवन मिशनमध्ये सरकारी कंत्राट घेऊन काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदारांने राज्य सरकारकडे बिल थकीत झाल्यानंतर गळ्याला दोरी लावून आयुष्य संपवल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडीमधील हर्षल पाटील यांनी सरकारकडे 1.40 कोटींचे बिल थकल्याने गेल्या अनेक महिन्यापासून वारंवार चकरा मारूनही बिल निघत नसल्याने आणि कर्जाने घेतलेल्या पैशांचा तगादा सुद्धा लागल्याने त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये गळ्याला दोरी लावत आत्महत्या केली. आत्महत्यानंतर आता विरोधकांनी सरकारवर सडकून प्रहार केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आज देवेंद्र फडणीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघती प्रहार केला. फडणवीसांना खोटं बोलण्याचा आणि विस्मरणाचा आजार झाल्याचा टोला सुद्धा लगावला. मंत्र्यांच्या लूटमारीनं, जलजीवन, एमएमआरडीए, नगरविकासाच्या भ्रष्टाचाराने सरकार अडचणीत आल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहिणीमुळे होणारे घोटाळे यामुळे राज्य डबल आलं असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. 

फडणवीस कोणत्या भ्रमात वावरत आहेत?

संजय राऊत म्हणाले की, हर्षल पाटील कर्ज घेऊन 1.40 कोटींचं जलजीवन मिशनचे काम करत होता. गेल्या अनेक महिन्यांपासून पैसे मिळण्यासाठी मिळण्याच्या चपलं झिजवली. मात्र हातबलताच हाती आल्याने त्याने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश पहिला असेल तर या निर्दयींना परिस्थिती काय आहे ते कळाली असती, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केल. ते पुढे म्हणाले की हे फडणवीस कोणत्या भ्रमात वावरत आहेत? दोन दिवसांपूर्वी मोदींनी किती मोठं कौतुक केलं होतं. मात्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये येऊन दोन दिवस राहावं आणि फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी कसं स्मशान केलं आहे ते पहावं. हा सदोष मनुष्यबदाचा गुन्हा असून त्याला कोण जबाबदार? अशी विचारणा त्यांनी केली. न्याय देण्यासाठी संबंधितांना गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली.

तुमच्याकडे 1.40 कोटी नाहीत का? 

ते पुढे म्हणाले की तुमच्याकडे 1.40 कोटी नाहीत का? सरकारी कंत्राटदारांचे 80,000 कोटी थकले आहेत. इतकेच नव्हे तर पैसे वसूल होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. मात्र हे मोदींप्रमाणे मौजमजा करत फिरत असल्याचा प्रहार संजय राऊत यांनी केला, फडणवीस यांच्या नक्षलवाद टिपणीवरून सुद्धा संजय राऊत यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, तुमच्याच पक्षांमध्ये नक्षलवाद सुरू सत्ताधारी पक्षाच्या नेत्यानं नर्तेकीवर गोळ्या झाडल्याचे ते म्हणाले. हनी ट्रॅप सुद्धा हा नक्षलवाद असल्याचे ते म्हणाले. हे सगळं तुमच्या सरकारमध्ये सुरु असताना तुम्ही कोणत्या गोलगप्पा करताय? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. 

महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला, तुम्ही काही केलं? 

आमच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना जाब विचारला, तुम्ही काही केलं? अशी विचारणा त्यांनी केली. तुमच्यामध्ये हिम्मत आहे का? असं सुद्धा त्यांनी विचारणा केली. कोकाटेंना काढण्याची हिंमत नाही आणि तो कोणाला धमक्या देता? अशीही विचारणा त्यांनी केली. सरकार गांभीर्याने चालवा असेही संजय राऊत यांनी सांगितलं. मोदी, शाहांना फडणवीस भेटत असतील तर तो त्यांचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले.