मुंबई : मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन सुरु आहे. विठ्ठल मंदिर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळालं. या आंदोलनावर प्रतिक्रीया देताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, 'पंढरपूरला प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे, हे चित्र सकरात्मक आणि चांगलं नसल्याचं माझं मत आहे.' तसेच प्रकाश आंबेडकर हे संयमी नेते आहेत. ते कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून या परिस्थितीमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची किंवा नियमभंगाची भाषा करणं म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.


संजय राऊत म्हणाले की, 'मंदिर बंद ठेवणं किंवा मंदिरांना एवढे महिने टाळं लावणं हे कोणी आनंदाने करत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संपूर्ण सरकार हे टप्प्याटप्यानं अनेक गोष्टी सुरु करत आहेत. लवकरच मंदिरांता विषय, रेल्वे सुरु करण्याचा विचार करण्यात येईल. पण अशातच विरोधी पक्षाने सुद्धा राज्याच्या हितासाठी संयम बाळगला तर राज्याच्या जनतेवर उपकार होतील.' पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'आज ज्याप्रकारने पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे, जी रेटारेटी सुरु आहे. हे चित्र सकारात्मक आणि चांगलं नाही असं मला वाटतं.'


पाहा व्हिडीओ : प्रकाश आंबेडकरांनी कायदेभंगाची भाषा करणं म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं : संजय राऊत



'पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी फक्त तिथे जमलेलं आंदोलकच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र आसूसलेलं आहे. वारकरी संप्रदायातील अनेक प्रमुख मंडळी, संस्था संघटना यांच्यासोबत आमची चर्चा झाली आहे. पण सोशल डिस्टन्सिंग हा कोरोना काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याचा पूर्ण फज्जा मंदिराबाहेर उडालेला दिसतोय. तिथे हजारो लोकं जमली आहेत. त्यातून संक्रमण वाढू शकतं.' असं संजय राऊत म्हणाले.


'पंढरपूरला प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवली आहे, मला वाटत हे चित्र सकरात्मक चांगलं नाही. वारकरी समंप्रयदायाशी आमची चर्चा झाली आहे. पण सोशल डिस्टनसिंग यामध्ये महत्वाचा आहे त्याचा पूर्ण फज्जा मंदिराबाहेर उडालेला दिसतोय त्यातून संक्रमण वाढू शकतं.' असं संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा धोका लक्षात घेऊनच मंदिरं उघडण्यास परवानगी दिलेली नाही. हे देशभरात आहे. पंतप्रधान मोदीही पूर्णपणे लॉकडाऊन उठवण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशातच नेते तिथे जाऊन गर्वाने सांगत आहेत, आम्ही नियम मोडण्यासाठीच येथे आलो आहोत.'


संजय राऊत म्हणाले की, 'प्रकाश आंबेडकर हे संयमी नेते आहेत. ते कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला कायदा आणि घटना दिली, त्यांचे ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून या परिस्थितीमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची किंवा नियमभंगाची भाषा करणं म्हणजे लोकांना हुसकावण्यासारखं आहे. तरी मला खात्री आहे की, यामधून मुख्यमंत्री आणि विरोधक एकत्रितपणे मार्ग काढतील. पण कोणीही कायद्याचं पालन करणार नाही, अशाप्रकारची भूमिका निदान आरोग्यविषयक प्रश्नावर घेऊ नये.'


'कदाचित प्रकाश आंबेडकरांनी घोषणा केल्यानंतर विरोधकांनी त्यांचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला असेल. कोणीही, किंवा प्रकाश आंबेडकरांसारखे प्रमुख नेते असतील, ज्यांच्यापाठीमागे समाज आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी किंवा गृहमंत्र्यांशी चर्चा करावी. पण अशाप्रकारे विठ्ठल मंदिराच्या बाहेर लोकांना वेठीस धरू नये. तसेच महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारताना दिसत आहे कोरोनासंदर्भात त्यात पुन्हा तणाव निर्माण करू नये.', असंही संजय राऊत म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या : 


पंढरपुरात वंचितचे कार्यकर्ते आक्रमक, प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'आम्ही नियम मोडण्यासाठीच आलोय'