Sanjay Raut Property Seize by ED : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना आज ईडीनं आणखी एक दणका दिला. ईडीनं (ED) संजय राऊत यांच्या अलिबागमधील आठ जागा आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे. 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ भूखंड घोटाळ्यात राऊत यांचे मित्र प्रवीण राऊत यांना आधीच अटक करण्यात आली आहे. या खटल्यात ईडीनं गेल्याच आठवड्यात आरोपपत्र दाखल केलं होतं. याच प्रकरणात आता संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. 


मुंबईतील एक हजार 34 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. 


ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्यासह कुटुंबियांच्या नावावर असलेले अलिबागमधील आठ भूखंड ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच, दादरमध्ये पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर असलेला राहत्या फ्लॅटवर ईडीनं टाच आणली आहे. दादरमधील एका इमारतीत 32 व्या मजल्यावर हा फ्लॅट असल्याची माहिती मिळत आहे. 


मला कल्पना होती, या कारवाईचं मला आश्चर्य वाटत नाही : संजय राऊत 


"ईडी किंवा सीबीआय माझ्या मागे लागली आहे, याची मला कल्पना होती. या कारवाईचं मला आश्चर्य वाटत असेल किंवा अशा कारवायांमुळे संजय राऊत किंवा शिवसेना खचली आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्यात तथ्य नाही. मुंबईतील राहतं घर ईडीनं जप्त केलंय" असं संजय राऊत म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :