सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असून सत्तापेच कायम आहे. अशातच संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत केलेलं हे विधान मोठं आहे. तसेच पवार आणि मोदी यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्षं असून त्यासंदर्भात अनेक चर्चाही सुरु आहेत.
Maharashtra Politics | शायरी, सियासत आणि शिवसेना | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
डिसेंबरच्या आत महाराष्ट्रात स्थिर सरकार
महाराष्ट्रात एक मजबूत सरकार डिसेंबरपूर्वी स्थापन होईल, सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु असून महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे काही कायदेशीर बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. परंतु जेव्हा राज्यपालांकडे आम्ही बहुमताचा आकडा सिद्ध करू त्यावेळी ते आम्हाला सराकर स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील . ही एक प्रक्रिया आहे. याआधीही देशात असं झालेलं आहे. जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी याच प्रक्रियेतून सर्वांना जावं लागतं. येत्या 5 ते 6 दिवसांत सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल, उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.
पवार-मोदी भेट
मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. जर एखादी समस्या असेल तर कोणीही त्यांची भेट घेऊ शकतं. पवार ओल्या दुष्काळासंदर्भात पंतप्रधानांची भेट घेणार असून राज्याला अतिरिक्त निधी देण्याबाबत विनंती करणार असल्याचं संजय राऊत यांनी बोलताना सांगितलं. महाराष्ट्रातील दोनच नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली होती. एक म्हणजे, उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं त्याची त्यांनी पाहणी केली. पवार आज दिल्लीत असल्यामुळे मोदींची भेट घेऊन याविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
Sanjay Raut PC | नव्या सरकारचं नेतृत्व शिवसेना करणार : संजय राऊत | ABP Majha
भाजप सत्तास्थापनेत अयशस्वी
संजय राऊत म्हणाले की, 'महाराष्ट्राचा देशातील सर्वात मोठ्या राज्यांमध्ये समावेश होतो. अशातच सर्वात मोठा पक्ष असलेलं भाजप सरकार स्थापन करण्यात असमर्थ आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी इतर पक्षांवर येते. इतर पक्षांकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहे. राज्याला एका स्थिर सरकारची गरज आहे. कारण राज्यात अनेक समस्या आहेत. राज्यातील शेकऱ्यांच्या प्रश्नासोबतच इतरही समस्या आहेत, तसेच लोकांचीही इच्छा आहे की, स्थिर सरकार लवकरात लवकर स्थापन व्हावं.'
शिवसेनाप्रमुखांचा आदेश अंतिम
आमच्या पक्षात कधीच दुमत नसतं. शिवसेना पक्षप्रमुख जो आदेश देतात तो अंतिम असतो. आमच्या पक्षात काय सुरु आहे आम्हांला माहित आहे, तुम्हाला याव्यतिरिक्त काही समजलं असेल तर ते चुकीचं आहे. उद्धव साहेब सांगतील तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय असतो. आमच्याकडे कोणत्याही क्रिया-प्रक्रिया नसतात, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.