औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या (16 सप्टेंबर) मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) होणार आहे. दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तर, याच पत्रकार परिषदेत आपल्याला संधी दिल्यास एक पत्रकार म्हणून मी उपस्थित राहणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. सोबतच मुख्यमंत्री यांना प्रश्न देखील विचारेल असेही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे जेवढी चर्चा आता मंत्रिमंडळाच्या बैठकीची होणार आहे, तेवढीच चर्चा शिंदेंच्या पत्रकार परिषदेची होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
"उद्या कॅबिनेटची बैठक आहे, त्यामुळे आम्ही थांबणार आहोत. बैठक तीन तासांची आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलतील. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू, तुम्ही किती खोटं बोलत आहेत हे आम्हाला ऐकायचं आहे. आम्हाला संधी मिळाली तर त्या पत्रकार परिषदेत आम्ही हजर राहू, समोरासमोर प्रश्न विचारु. आम्ही देखील पत्रकार आहोत. त्यामुळे मी जाणार आहे. आम्हाला जर पोलिसांनी अडवलं नाही तर, त्या पत्रकार परिषदेत मी सुद्धा जाईन. तुमच्या हातात कायद्याच्या बंदुकी आहे, त्यामुळे तुम्ही अडवलं नाही तर मी नक्की जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री यांना पत्रकार म्हणून प्रश्न विचारणार," असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा