Sangola Nagarpalika Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. सांगोला तालुक्यात देखील राजकीय वातावर तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सांगोला नगरपालिकेत (Sangola Nagarpalika Election)  यंदा रंगदार लढती दिसणार असून एकाच वेळेला आजोबा आणि नातू दोघेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सांगोल्यातील पूर्वाश्रमीचे शेकापतचे ज्येष्ठ नेते मारुती आबा बनकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली आहे. 

Continues below advertisement

मारुती आबा बनकर हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ उमेदवार

मारुती आबा बनकर हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ उमेदवार असून त्यांनी यापूर्वी दोन वेळेला सांगोल्याचे नगराध्यक्ष पद भूषवले आहे. मारुती आबा बनकर यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करताना त्यांचा नातू ज्योतिरादित्य बनकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे मारुती आबा बनकर हे सर्वात जास्त वयाचे उमेदवार असून त्यांचा नातू ज्योतिरादित्य हा सर्वात कमी वयाचा उमेदवार आहे. आता सांगोला नगरपालिका निवडणुकीत 73 वर्षांचे आजोबा मारुती आबा बनकर नगराध्यक्षपदासाठी तर त्यांचा 21 वर्षाचा नातू ज्योतिरादित्य हा नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे.

शहाजी बापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने त्यांच्यासोबतचे युतीचे प्रस्ताव धुडकावले

सांगोल्यात सध्या नगरपालिकेत भाजपचा मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने त्यांच्यासोबतचे युतीचे प्रस्ताव धुडकावत बापूंचे विरोधक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाशी युती केली. एवढे करून न थांबता नगराध्यक्षपदासाठी त्यांचेच उमेदवार आयात करून त्यांचा प्रवेश भाजपात घडविला, हे सर्व करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे थेट हेलिकॉप्टरने सांगोल्यात आले होते.  गेली 55 वर्ष स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यासोबत काम करणारे झटक्यात भाजपमध्ये जातात आणि निवडणूक उमेदवारी दाखल करतात, हे पाहून स्वर्गीय गणपतरावांच्या आत्म्यास किती क्लेश होत असेल अशी टीका शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती. यापुढे सोंग बंद करुन स्वर्गीय गणपतरावांचा विचार सोडणाऱ्यांनी त्यांचा फोटोही वापरू नये, त्यांच्या समाधीवर दर्शनाला जाण्याचा अधिकारही त्यांनी गमावला असून आता यापुढे त्या समाधीची जबाबदारी मी उचलणार असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

एका पक्षप्रवेशासाठी मंत्री हेलिकॉप्टरने आले अन् गेले; गुवाहटी फेम शहाजी बापूची भाजपवर बोचरी टीका