Jalna Crime News : जालना (Jalna) शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील नूतन वसाहत (Nutan vasahat)  भागात एका 45 वर्षीय व्यक्तीवर तलवारीने हल्ला करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब सोमधाने असं मृत्यू झालेल्या वक्तीचे नाव आहे. बाबासाहेब सोमधाने हे भाजीपाला घेत असताना चारचाकी वाहनात आलेल्या तीन जणांकडून भर बाजारात तलवारीने त्यांच्या हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

Continues below advertisement

पोलिसांनी तीन संशयितांना घेतलं ताब्यात, चौकशी सुरु 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर पोलिसांनी लगेच या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. जुना वाद आणि जमिनीच्या व्यवहारातून हा वाद झाल्याने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमकं हत्या करण्याचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, अचानक चारचाकी गाडीतून तीन जणांना येऊन बाबासाहेब सोमधाने यांच्यावर तलावारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेमुळं जालना शहरात खळबळ उडाली आहे. 

अंबरनाथमध्ये दहशत पसरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या आठ तासात पकडले

अंबरनाथच्या जावसई परिसरात 17 नोव्हेंबर रोजी तलवारी, कोयते आणि दगडफेकीसह तिहेरी हल्ला करून दहशत पसरवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या आठ तासांत पकडले होते. या प्रकरणात सात आरोपी आणि दोन अल्पवयीन अटक करण्यात आली आहे. पोलिस तपासात हा प्रकार जुन्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले असून, राजकीय संबंध नसल्याचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. आरोपींना तपासाचा भाग म्हणून घटनास्थळी नेऊन सखोल तपास करण्यात आला. कोण कुठे उभा होता, कोणत्या दिशेने हल्ला झाला, कोणत्या शस्त्रांचा वापर झाला आहे. घटनास्थळी नेले असताना काही आरोपींनी परिसरात घोषणा दिल्या आहेत. अशा प्रकारची गुन्हेगारी करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल. कोणताही गुन्हेगार कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. नागरिकांनी भीती न बाळगता पोलिसांना सहकार्य करावे असे अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

BJP Leader Nephew Murder Case: दुपारी मोठ्या भावाला दिली धमकी, संध्याकाळी लहान भावाला संपवलं; भाजप नेत्याच्या पुतण्याच्या हत्येची थरारक कहाणी