चार वर्षांखालील तीन लेकरांसह विवाहितेची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2018 01:14 PM (IST)
सांगलीतील जत शहरामध्ये महिलेने तीन लेकरांसह विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं.
सांगली : विवाहितेने आपल्या तीन लेकरांसह आत्महत्या केल्याची ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सांगलीतील जत शहरामध्ये महिलेने विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवलं. 30 वर्षीय राधिका सुभाष कोळीने तीन मुलांसह मध्यरात्री जतच्या यल्लम्मा देवी परिसरातील विहिरीत उडी घेतली. चार वर्षांचा हर्षल, तीन वर्षांचा प्रज्वल आणि दोन वर्षांची चिताका मृत्युमुखी पडले. घरगुती कारणातून राधिका यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. विहीर खोल असल्याने मृतदेह शोधण्यात बऱ्याच अडचणी आल्या. ही घटना समजताच नागरिकांनी विहिरीशेजारी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे जत तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.