सांगली: राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेणारा, अण्णा अण्णा म्हणणारा सांगलीचा बोलका कोंबडा सध्या मौनात गेला आहे. मागील काही दिवसांपासून त्याने अण्णा अण्णा..ओरडणे सोडून दिलं आहे.


काही दिवसांपूर्वी सांगलीच्या या अण्णा अण्णा ओरडणाऱ्या कोंबड्याची बातमी एबीपी माझावर झळकली होती. त्यानंतर या पट्ट्याला पाहण्यासाठी देशभरातील लोक सांगलीत येत होते.

या बोलक्या कोंबड्यामुळे त्याच्या मालकाला आणि त्या गावाला जगभर प्रसिद्धी मिळाली. त्याला काही चित्रपटाच्या, शॉर्ट फिल्मच्या ऑफर देखील आल्या. पण मागील काही दिवसापासून हा कोंबडा मौनात गेला आहे. म्हणजे तो अण्णा-अण्णा असे ओरडत नाही.

अण्णा.. अण्णा म्हणणारा कोंबडा लवकरच सिनेमात झळकणार!  

या कोंबड्याचे मालक असेलेल्या अण्णांनीदेखील याला दुजोरा दिला.

यामुळे या कोंबड्याच्या हजारो चाहत्यांसह त्याला चित्रपटात काम देणारेही नाराज झाले आहेत. पण या कोंबड्याच्या मालकांनी मात्र हा अण्णा म्हणून नाही ओरडला तरी चालेल पण मरेपर्यंत त्याचा सांभाळ करु असे म्हटलं आहे.

खानापूर तालुक्यातील आळसंद गावचा हा देखणाबांड कोंबडा बांग देण्याबरोबरच जसा काय अण्णा..अण्णा म्हणून ओरडला, तसा हा कोंबडा सगळ्या माध्यमाच्या गळ्यातील ताईत बनला. जिल्ह्यातून, जिल्हा बाहेरुन हजारो लोक या अनोख्या कोंबडयाला पाहण्यासाठी आळसंद गाव गाठले. कानडी चित्रपटासाठी या कोबड्याला ऑफर्स देखील आल्या. पण याच्या अगोदरच या महाशयाने अण्णा..अण्णा म्हणून ओरडणे सोडून दिलं आहे. त्यामुळे त्याच्या मालकापासून ते सर्वांची निराश झाली आहे.

जरी हा कोंबडा आत्ता अण्णा म्हणून ओरडत नसला, तरी मोहिते कुटुंबाचे त्याच्यावरील प्रेम काही कमी झाले नाही. आमचा कोंबडा अण्णा म्हणू दे किंवा नाही म्हणू दे, तो फक्त भरपूर जगावा, अशी मोहिते कुटुंबीयांची इच्छा आहे.

हा कोंबडा अण्णा..आणा ओरडणे अचानक का बंद झाला याचे उत्तर कुणाकडेही नाही.. मात्र जरी हा कोंबडा आता अण्णा म्हणून ओरडत नसला तरी तो पुन्हा बोलेल अशी सगळयांना आशा आहे.

संबंधित व्हिडीओ



संबंधित बातम्या

अण्णा.. अण्णा म्हणणारा कोंबडा लवकरच सिनेमात झळकणार! 

 कुत्र्यापासून नव्हे... कोंबड्यापासून सावध रहा, कोल्हापूरचा अँग्री बर्ड