नाशिक : नाशिक रोडवरील घोटी टोलनाक्यावर बॉडीगार्डने टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळला आहे. काच फुटल्याने संबंधित कर्मचारी जखमी झाला, असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

एकनाथ शिंदे यांनी बॉडीगार्डला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण टोलवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या बॉडीगार्डने काचवर पंच मारुन काच फोडली, त्यानंतर संदीप घोंगडे हा कर्मचारी रक्तबंबाळ होऊन खाली पडला, असं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.



दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्यास बॉडीगार्डवर कारवाई करण्यात येईल, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे नाशिकहून ठाण्याकडे येत असताना त्यांच्या गाडीला व्हीआयपी लेनमधून सोडण्यास टोम कर्मचाऱ्यांनी नकार दिला. व्हीआयपी लेन बंद असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला आणि संदीप घोंगडे यांना बेदम मारहाण करण्यात आली.

पाहा व्हिडिओ :


PHOTO : एकनाथ शिंदेंसमोर बॉडीगार्डची टोल कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण


एकनाथ शिंदेंच्या सुरक्षारक्षकाची टोल कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण