सांगली : दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या मागणीसाठी काल (सोमवार) सांगलीत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चात काढला होता. मात्र, या मोर्चात महिला शिवसैनिकांमध्येच राडा झाला. शिवसेनेतील महिला आघाडीच्या दोन गटातील वाद या मोर्चात उफाळून आला.

विश्रामबागमधील क्रांतिसिह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात झाल्यानंतर महिला शिवसैनिकांमध्ये मागे-पुढे चालण्यावरुन वाद होऊ लागला. शेवटी हा वाद टोकाला गेला आणि माजी महिला जिल्हाध्यक्ष असलेल्या महिलेने आजी महिला जिल्हाध्यक्षच्या एका कार्यकर्तीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पुरुष शिवसैनिकांनी वेळीच मध्यस्थी करत हा वाद सोडवला.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनापेक्षा सध्या महिला कार्यकर्त्यांच्या राड्याचीच चर्चा सांगलीत सध्या सुरु आहे.