काँग्रेसकडून फिट्टमफाट, सांगलीत राष्ट्रवादीला दणका
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2016 12:10 PM (IST)
सांगली: काँग्रेसने पुणे विधानपरिषद निवडणुकीत धक्का देणाऱ्या राष्ट्रवादीची परतफेड सांगलीत केली आहे. कारण अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी बाजी मारली आहे. मोहन कदम यांनी 309 मतांसाठी सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघात विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांना 246 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात काँग्रेसची मतं फोडली, तर काँग्रेसने सांगली-साताऱ्यात राष्ट्रवादीची मतं फोडून फिट्टमफाट केली. सांगली-सातारा विधानपरिषद निकाल: 1) मोहनराव कदम (काँग्रेस) :- 309 2) शेखर गोरे (राष्ट्रवादी) :- 246 3) शेखर माने (अपक्ष) :- 2 4) मोहनराव गु. कदम (अपक्ष) :- 1 5) बाद मते :- 10 सांगली - सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी 19 नोव्हेंबरला मोठ्या चुरशीने मतदान झालं होतं. दोन्ही जिल्ह्यात एकूण आठ मतदान केंद्रावर 99.82 % म्हणजे 570 पैकी 569 मतदारांनी मतदान केलं. विधानपरिषद निवडणूक निकाल काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहनराव कदम यांनी 105 % आपण निवडून येऊ असा विश्वास वक्त केला होता. दुसरीकडे काँग्रेसची बंडखोरी मतदानापर्यंत कायम राहिली होती. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार शेखर माने यांनी ८-१० नगरसेवकांसोबत मतदान करत आपले शक्तीप्रदशन केले होते. राष्ट्रवादीची मात्र काही मते फुटल्याची चर्चा होती. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळाली होती. तर किंगमेकरची भाषा केलेल्या भाजपच्या मतदारांनी शांतपणे मतदान करत आमच्या पक्षाची भूमिका काय होती हे मतदानानंतर समजेल अशी भूमिका घेतली होती. जनतेचा विश्वास जिंकला : मोहनराव कदम काँग्रेस पक्षाशी ठेवलेली एकनिष्ठता आणि सर्वसामान्य जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास हे माझ्या विजयाचे गमक आहे, अशी प्रतिक्रिया सांगली-सातारा विधानपरिषदेत विजयी ठरलेले काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांनी दिली. संबंधित बातम्या पुणे: मतं होती 298, मिळाली 440, राष्ट्रवादीचा गेम प्लॅन यशस्वी विधानपरिषद निवडणूक निकाल