स्मार्ट बुलेटिन | 24 ऑक्टोबर 2021 | रविवार | एबीपी माझा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.



1. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या रणांगणात आज भारत आणि पाकिस्तानचा महासंग्राम, विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी विराटसेना सज्ज

T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान संघानं आपल्या अंतिम 12 खेळाडूची घोषणा केलीय. भारतीय संघाच्या अंतिम 11 खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचं दिसत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचं पारडं जड आहे. आतापर्यंत पाकिस्तानविरोधात एकदाही भारतीय संघाचा पराभव झालेला नाही. ही भारतीय संघासाठी जमेची बाजू मानली जात आहे. पण टी-20 मध्ये काहीही होऊ शकतं हे विसरता कामा नये. बाबर आझमच्या संघाविरोधात विराट कोहलीचा संघ कसा सामना करतो, पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
2. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हे राष्ट्रहित आणि राष्ट्रधर्माच्या विरोधात, रामदेव बाबांकडून टीका, नशेच्या विळख्यात अडकलेल्या बॉलिवूडवरही भाष्य
 
3. आर्यन खाननं कारागृहात वाचण्यासठी राम आणि सीतेवरची पुस्तकं मागवली, सूत्रांची माहिती, मंगळवारी आर्यनच्या जामिनावर सुनावणी
 
4. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे भाविकांची फसवणूक, बोगस वेबसाईटच्या आधारे लुटलं, उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
 
5. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग, राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही कोरोना, लशीचे दोन डोस झाल्यानंतरही कोरोना, दोघांचीही प्रकृती उत्तम

6. देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल कडाडलं; मुंबईत एक लिटर डिझेल 104, तर पेट्रोल 113 वर


Petrol Diesel Price 24 Oct 2021 : भारतीय तेल कंपन्यांच्या वतीनं आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आज डिझेलचे दर 34 ते 38 पैशांनी, तर पेट्रोलचे दर 30 ते 35 पैशांनी वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. देशात सातत्यानं वाढणाऱ्या महागाईमुळं आधीच सर्वसामान्य त्रस्त आहेत, अशातच सातत्यानं वाढणारे पेट्रोल-डिझेलचे दर त्यांच्या चिंतेत आणखी भर घालत आहेत. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.59 रुपये, तर डिझेलचे दर 96.32 रुपये प्रति लिटर आहेत. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 113.46 रुपये आणि डिझेलची किंमत 104.38 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 108.11 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 99.43 रुपये प्रति लिटर आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 104.52 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 100.59 रुपये प्रति लिटर आहेत. 



7. सर्वसामान्यांच्या संकटात आणखी एक भर! लालपरीचा प्रवास महागणार, पेट्रोल-डिझेलनंतर आता एसटीची भाडेवाढ?

8. काम वेळेत पूर्ण न केल्याने जिम मालकानं कामगारांना कोंडलं, धमकीच्या भितीनं ठेकेदाराची आत्महत्या, कल्याणमधील घटना

9 . अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर आबिदीन खुर्रम यांच्या श्रीमुखात लगावली, शपथविधी सोहळ्यात घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल

10. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून आफ्रिकेचा पराभव, तर वेस्ट इंडिजचा इंग्लंडकडून धुव्वा