Sangli Miraj Ganpati Visarjan: सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या (sangli Miraj Ganesh Utsav) प्रसिद्ध गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कमानी सज्ज झाल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीवेळी भव्य अशा स्वागत कमानी उभारण्याची मागील बेचाळीस वर्षांपासूनची परंपरा आहे. मिरवणुकी साठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील चित्रण या कमानीवर लावण्यात येते.
यंदा धर्मवीर संभाजी मंडळाने कोरोनाचा नायनाट करणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्तीचं चित्र कमानीवर लावलं आहे. हिंदू एकता आंदोलनांमार्फत स्वागत कमानीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र तयार केलं आहे. अखिल भारतीय विश्वशांती मंडळाने कैलास पर्वत आणि महादेवाचं चित्र बनवलं आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने बाजीप्रभू देशपांडे यांचा देखावा बनवला आहे. शिवसेनेने आपल्या कमानी वरती छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र तयार केलं आहे. तर एकता सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाने आपल्या कमानीवर प्रदूषण हटवा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश दिला आहे. विश्वस्त मंडळाने शंकराची प्रतीकृती उभा केली आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा
सांगली जिल्ह्यातील मिरजेच्या गणेश उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा आहे. अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या येथील विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. मिरज शहरात गेल्या 42 वर्षापासून भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात येतात. धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावरील चित्रण या वर लावण्यात येते.
शहरात 170 गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार
कोरोनामुळे मागील दोन वर्ष मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला गेला नव्हता, मात्र यंदा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव आणि विसर्जन सोहळा साजरा केला जात आहे. यंदाच्या अनंत चतुर्थीच्या दिवशी मिरज शहरात 170 गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी एक हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या