Anant Chaturdashi 2022 Date and Time : अनंत चतुर्दशी दिवशी (Anant Chaturdashi 2022) श्री विष्णूच्या अनंत रूपांचीही विधिवत पूजा केली जाते. भगवान विष्णूंना आरंभ किंवा अंत नाही, ते अनंत आहे. 14 जणांचं रक्षण करण्यासाठी श्री विष्णूनं या दिवशी चौदा रूपं धारण केली, त्यामुळे या दिवसाला अनंत चौदस असंही म्हणतात, अशी अख्यायिका आहे. अनंत हे भगवान विष्णूचं एक नाव आहे. यावेळची अनंत चतुर्दशी खूप खास आहे कारण यंदा अनंत चतुर्दशी शुक्रवारी आहे, त्यामुळे भगवान विष्णूच्या पूजेसोबत श्री विष्णूची अर्धांगिनी महालक्ष्मीचीही पूजा आहे. अनंत चतुर्दशीला उपवास करून अनंताची म्हणजेच भगवान विष्णूची पूजा केल्यास भक्तांची कामे विनाअडथळा पूर्ण होतात, असा समज आहे. जाणून घ्या मुहूर्त आणि विधी.
अनंत चतुर्दशी 2022 मुहूर्त
- अनंत चतुर्दशी तिथी सुरु : 8 सप्टेंबर 2022, रात्री 09.02 वाजता
- अनंत चतुर्दशी तिथी समाप्त : 9 सप्टेंबर 2022, संध्याकाळी 06.07 वाजता
भगवान विष्णूच्या पूजेचा मुहूर्त
यंदा अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी 06.10 पासून संध्याकाळी 06.09 या काळात भगवान विष्णूच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही सोयीनुसार, श्री विष्णूची पूजा करु शकता. यंदा लक्ष्मी - नारायणाच्या पूजेचा योग आल्याने हे व्रत केल्यास तुमच्या अडचणी दूर होतील आणि तुम्हांला धन प्राप्ती होईल.
अनंत चतुर्दशीचं महत्त्व
अनंत चतुर्दशी दिवशी उपवास करत भगवान श्रीकृष्णाच्या अनंत रुपाची पूजा केल्यानं भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात. तसेच लक्ष्मी मातेची आराधना केल्यानं धनप्राप्ती होते. अनंत चतुर्दशीचं व्रत स्वत: श्रीकृष्णाने युधिष्ठरला सांगितलं होतं. भगवान विष्णूनं युधिष्ठरला सांगितलं होतं की, हे व्रत केल्यास द्युत (सारीपाट) हरलेलं साम्राज्य आणि संपत्ती परत मिळेल. 14 लोकांचं रक्षण करण्यासाठी श्री विष्णूनं या दिवशी चौदा रूपं धारण केली, त्यामुळे या दिवसाला अनंत चौदस असंही म्हणतात, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे या दिवशी चौदा गाठी असणारा अनंत धागा हातावर बांधला जातो. यामुळे भगवान विष्णूची कृपा राहून मार्गातील सर्व अडथळे दूर होतात, असं मानलं जातं.
अनंत चतुर्दशी पूजा विधी
अनंत चतुर्दशीसाठी तुम्हाला व्रत पाळावं लागेल जर. यासाठी तुम्ही चतुर्दशीच्या दिवशी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून उपवास करावा. यानंतर पूजास्थळी कलशाची स्थापना करावी. या कलशावर एक धातूचं भांडे ठेवा आणि त्यावर कुश लावून भगवान अनंतांची स्थापना करा.
सुती किंवा रेशमी धाग्याला हळद किंवा कुंकू लावा आणि त्यात 14 गाठी बांधा. त्यानंतर हे रक्षासूत्र भगवान विष्णूला अर्पण करा. त्यानंतर पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने पूजा करावी. व्रताच्या दिवशी व्रतकथा आणि विष्णु सहस्रनामाचे पठण करावे. हे विशेषतः फलदायी मानले जाते. भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर, दीर्घायुष्य आणि सर्व संकटांपासून मुक्तीसाठी चौदा गाठी असणारा अनंत धागा म्हणजेच अनंत रक्षासूत्र आपल्या हातात बांधा. अनंत चतुर्दशी दिवशी भगवान विष्णूचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते.