सांगली: सांगलीत मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली. तिथून कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मोर्चावेळी बंदोबस्त म्हणून १८०० पोलीस कर्मचारी, ७५० होमगार्ड, एसआरपीएफच्या ४ तुकड्या असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला गेला आहे. तसंच सांगली शहरातली वाहतूक सकाळी ६ पासूनच बंद करण्यात आली आहे.
माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, आर.आर.पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील, या मोर्चात सहभागी झाल्या. याशिवाय भाजप खासदार संजयकाका पाटील, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विलास जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यासह अनेक नेते मोर्चात सहभागी झाले.
विशेष म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनी यावं, मात्र मोर्चादरम्यान माध्यमांशी बोलू नये, अशी अट आयोजकांनी घातली आहे.