थकीत ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचे अर्धनग्न होत भीक मांगो आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2019 08:31 PM (IST)
थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन भीक मागो आंदोलन केले आहे. सांगलीतलत्या कडेगाव तालुक्यातील केन अॅग्रो साखर कारखान्यात हे आंदोलन करण्यात आले आहे.
सांगली : थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन भीक मागो आंदोलन केले आहे. सांगलीतलत्या कडेगाव तालुक्यातील केन अॅग्रो साखर कारखान्यात हे आंदोलन करण्यात आले आहे. मागील 2 वर्षांपासून शेतकऱ्यांची ऊस बिलं थकल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. अनेक शेतकऱ्यांची गेल्या 2 वर्षांपासूनची ऊसाची बिले थकीत आहेत. मात्र कारखाना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेट कारखान्यावर धडक देत आंदोलन केले. अर्धनग्न होऊन शेतकऱ्यांनी यावेळी थेट कारखाना परिसरात भीक मागो आंदोलन केले आहे. आम्ही कसे जगायचे? असा उद्विग्न प्रश्न करत, ऊसाची बिले देत नाहीत, तर किमान भीक तरी द्या, अशी विनवणी कारखाना परिसरातील कर्मचारी आणि प्रशासनासमोर शेतकऱ्यांना केली आहे. व्हिडीओ पाहाच : पीकविमा कंपन्यांकडून निविदा न आल्याने शेतकऱ्यांचे हाल | बीड | ABP Majha