सांगलीच्या पलूस तालुक्यातील अनेक गावांमध्ये सर्वपक्षीय बंद
एबीपी माझा वेब टीम | 07 Jan 2017 11:28 AM (IST)
सांगली : सांगलीतील भिलवडीत अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणाच्या निषेधार्थ पलूस तालुक्यातील अनेक गावात बंद पाळण्यात आलाय. जिल्हाभरात या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, या प्रमुख मागणीसह ग्रामस्थांनी भिलवडी पोलीस स्टेशनला घेराव घातला. त्यामुळे भिलवडीसह इतर गावांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. काही जणांना संशियत म्हणून ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांची काही पथके आरोपीच्या शोधात आहेत. खासदार संजय पाटील यांनी भिलवडी गावाला भेट देऊन नागरिकांनी अफवा पसरवू नये, असं आवाहन केलं. शिवाय झालेली घटना दुर्देवी असून पोलीस आरोपीवर योग्य ती कारवाई करतील, असं सांगितलं.