सांगली : नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर सोन्याची तस्करी करताना सांगली जिल्ह्यातल्या आटपाटी तालुक्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री सिमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी विभाग यांनी संयुक्तपणे आटपाडी तालुक्यात छापे टाकले. त्यावेळी संशयितांच्या घरामधून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर अटक केलेल्या आठ जणांकडून तब्बल 43 कोटी रुपयांची 83.6 किलो सोने जप्त करण्यात आले. हे सोने बिस्किटाच्या स्वरुपात होती. डीआरआयने ही हे सोने जप्त केले. त्यांनतर आटपाडी तालुक्यात छाप टाकले. संशयित मणिपुरच्या सीमेवरून तस्करी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महसूल गुप्तचर संचालनयाच्या अधिकाऱ्यांकडून असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की, संशयित नेहमीच याच मार्गाने सोन्याची तस्करी करत असावेत. आटपाडी तालुक्यात सिमा शुल्क विभाग, केंद्रीय जीएसटी विभाग या पथकांनी टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची माहिती हाती लागले आहे. तसेच यामागे मुख्य सूत्रधार कोण, याचाही शोध घेतला जात आहे. यातून सोन्याची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
काही आरोपी आटपाडी तालुक्यातील
सीमाशुल्क विभाग व सांगली केंद्रीय जीएसटी आधिकरी यांनी आटपाडी तालुक्यात संयुक्त छापे घातले आणि आरोपीच्या घरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. नवी दिल्लीतील रेल्वे स्टेशन वरून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) म्यानमारहून भारतात तस्करी करणार्या व दिल्ली रेल्वे स्थानकात अटक केलेल्या आठ जणांकडून शनिवारी 43 कोटी रुपयांचे सोने जप्त केले असे सांगितले. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरोपींकडून सोन्याचे 504 बार ज्याचे वजन 83.6 किलो आहे असे त्यांनी जप्त केले.
Pune Medical System | बाणेरमधील उद्घाटन झालेल्या रुग्णालयात एकही रुग्ण नाही, नुसताच रुग्णालयांचा थाट का?