मुंबई : एनसीबीने अटक केलेल्या आरोपींचा सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंध असल्याचा तपास करण्यासाठी आरोपीची एनसीबीने कोठडी मागितली आहे. तर याच आरोपींनी बॉलीवूड जगतातील अनेकांना अंमली पदार्थ दिल्याचा दावा देखील एनसीबीने केलाय. त्यामुळे जैद विलोत्रा या अंमली पदार्थ तस्कराची 14 दिवसांची कोठडीची मागणी एनसीबीने न्यायालयात केली होती. त्यांवर जैद विलोत्राची सात दिवसांकरता म्हणजेच 9 सप्टेंबर पर्यंत न्यायालयाने एनसीबी कोठडीत रवानगी केली आहे.


धक्कादायक म्हणजे जैद विलोत्रा याचा संबंध सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी असल्याचा संशय एनसीबीला आहे तर जैद आणि त्याच्या साथीदारांनी बॉलीवूडमधील अनेक सिने तारकांना अंमली पदार्थ पुरवल्याचे तपासात कबूल केले आहे. त्यामुळे जैद आणि बसित यांच्या संपर्कात असलेल्या बॉलीवूड कलाकारांची चौकशी करायची असल्याने जैद विलोत्राची एनसीबी कोठडी आवश्यक असल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले. त्यांवर न्यायालयाने जैद विलोत्राची 9 सप्टेंबर पर्यंतची एनसीबी कोठडीत रवानगी केली. काल एका मागोमाग एक काही तासातच एनसीबीने चार जणांना अटक केली.


जैद विलोत्रा, बसित परिहार, कुणाल अरोरा आणि अब्बास लखानी यांना अटक केली आहे. काल यांच्या एनसीबी कोठडीची तयारी करण्यातच खुप वेळ गेल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले नाही. आज देखील एनसीबीने मुंबईत छापे मारी सुरुच ठेवली असुन आज आणखी दोघांना ताब्यात घेणार असल्याची माहिती एनसीबी सुत्रांनी दिली आहे.


जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा शौविकच्या संपर्कात होता. यामुळे रिया देखील शौविक कडून अंमली पदार्थ घेत असावी, अशी शंका एनसीबीला आहे. त्यामुळे रियाच्या आधी शौविक चक्रवर्तीला एनसीबी लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे अस बोललं जात आहे.


अंमली पदार्थप्रकरणी काल पहाटे बसीत नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील ताब्यात घेतले आहे. हा तोच बसीत आहे ज्याने जैदची ओळख शौविकशी करुन दिली होती. बसीत हा शौविकचा खास असून शौविक, बसीत आणि जैद अशी तिघांची जोडी होती. जैद हा वांद्रे येथे राहत असून त्याचे पुर्ण नाव जैद विलात्रा आहे. एनसीबीच्या हाती एक व्हॉटसअॅप चॅट लागलंय ज्यामध्ये या जैद आणि बसीतचे नाव आहे. हा जैद सॅम्युल मिरांडाच्या देखील संपर्कात होता. जैदचे बसीत आणि सुर्यदिप मल्होत्रा नावाच्या दोन तरुणांसोबत व्हाटसप चॅट समोर आलय. सुर्यदीप देखील शौविकशी संपर्कात असलेल्यांपैकी एक आहे. 17 मार्च 2020 या दिवशी शौविकने सॅम्युल मिरांडाला जैदचा नंबर दिला होता.


संबंधित बातम्या :