सांगली: राज्यातील 288 आमदार हे बिनकामाचे आहेत, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केलं आहे. सांगलीतल्या तासगावात झालेल्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या बैठकीत ते बोलत होते.

तासगावमध्ये शिवप्रतिष्ठानच्यावतीने गडकोट मोहिम आणि 32 मन सुवर्ण सिंहासन पुर्नस्थापना या विषयावर ही बैठक आयोजित केली होती.

आतापर्यंत शिवरायांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिवाय या राज्यकर्त्यांपैकी एकालाही प्रतापगडाच्या कुशीत महाराजांचे स्मारक व्हावे, असे का वाटत नाही? असा सवालही भिडे यांनी विचारला.

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

“आजपर्यत शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीस्कर राजकारणानुसार केला. या लोकांना शिवरायांच्या विचारांशी, त्यांच्या कार्याशी देणे घेणे नाही. प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी सध्या कुणीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातील 288 आमदार हे जवळसपास बिनकामाचे आहेत”, असं भिडे म्हणाले.

शिवप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या संभाजी भिडे गुरुजींची कहाणी

यावेळी भिडे गुरुजींनी भाजपचे खासदार संजय पाटील यांनाहीलक्ष्य केले. खासदार संजय पाटील हे मराठा आहेत पण ते कधीच म्हणाले नाहीत, की शिवरायांचे स्मारक व्हावे, यासाठी मी उपोषणाला बसेन. शिवरायांच्या नावाचा वापर करुन राजकारण केले जात आहे. आपला देश दहशतवाद, आंतकवाद यामध्ये सापडलेला आहे. मात्र तो आतंकवाद संपवण्यासाठी शिवरायांनी घालून दिलेली शिकवण आज कोणीच अंमलात आणत नाही. राज्यात शिवरायांचे हजारो पुतळे उभे केले आहेत, हे राज्यकर्त्यांचे केवळ नाटक आहे, असेही भिडे गुरुजी म्हणाले.



संबंधित बातम्या

शिवप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या संभाजी भिडे गुरुजींची कहाणी

भिडे गुरुजी समर्थकाची मुख्यमंत्र्याना जीवे मारण्याची धमकी : प्रकाश आंबेडकर

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण