कवठेएकंदमध्ये शोभेच्या दारुचा स्फोट, 12 वर्षीय मुलाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Oct 2018 02:27 PM (IST)
प्रणव शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता आपल्या घराजवळ शोभेच्या दारुची आताशबाजी करत होता.
NEXT PREV
सांगली : तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमध्ये ऐतिहासिक विजयदशमीच्या सोहळ्यात रात्रभर करण्यात येणाऱ्या शोभेच्या दारुच्या आतषबाजी सोहळ्याला यंदा गालबोट लागलं. आतषबाजी करताना कागदी शिंगट्याचा स्फोट झाल्याने प्रणव प्रवीण घाईल या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. प्रणव शुक्रवारी पहाटे साडेचार वाजता आपल्या घराजवळ शोभेच्या दारुची आताशबाजी करत होता. यावेळी कागदी शिंगट्याची आतषबाजी करत असताना ते अचानक फुटून जोरात स्फोट झाला. या शिंगट्याचा दटट्या डोक्याला लागल्याने प्रणव अंगणात भाजलेल्या अवस्थेत पडला. त्यानंतर प्रणवला भाजलेल्या अवस्थेत तात्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. पण पहाटे त्याचा मृत्यू झाला. या घटनेची तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रणव हा कवठेएकंदमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे. सकाळी अकारा वाजता गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.