अहमदनगरमधील संगमनेरमध्ये स्वतंत्र जिल्ह्याची गुढी
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2018 03:11 PM (IST)
गेल्या पंधरा दिवसांपासून संगमनेर आणि अकोले तालुक्यात नागरिकांच्या सह्यांची मोहिम सुरु आहे. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत 80 हजारांहून अधिक नागरिकांनी यावर सह्या केल्या आहेत.
संगमनेर : अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या घोषणेनंतर नवीन जिल्ह्याचं मुख्यालय संगमनेर व्हावं, या मागणीसाठी संगमनेर जिल्हा कृती समिती आक्रमक झाली आहे. गुढीपाडव्याचं औचित्य साधत समितीच्या वतीनं संगमनेरमध्ये वेगळ्या जिल्ह्याची गुढी उभारण्यात आली. गेल्या पंधरा दिवसांपासून संगमनेर आणि अकोले तालुक्यात नागरिकांच्या सह्यांची मोहिम सुरु आहे. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत 80 हजारांहून अधिक नागरिकांनी यावर सह्या केल्या आहेत. अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी नुकतीच अहमदनगर जिल्हा विभाजनाची घोषणा केली होती.