सर्व सायकलपटूंचे नुकतेच सांगलीच आगमन झाले यावेळी कर्नाळा या त्यांच्या गावी जंगी स्वागत करण्यात आले. कर्नाळ ते कन्याकुमारी सायकल प्रवास करत गेलेले कर्नाळचे पाच जिगरबाज शनिवारी सकाळी गावात दाखल झाले. त्यांच्या गावतील ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. ढोलताशे हलगीच्या वादनात व फटाक्यांची आतषबाजी करत तसेच त्यांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावातील महिलांनी औक्षण करीत या सर्वांचे स्वागत केले. 1360 किमीचा सायकल प्रवास यशस्वी केल्याने या सर्वांचे कौतुक करण्यात आले.

'SAY NO TO PLASTIC' व 'सायकल चालवा फिट रहा' हा संदेश घेऊन कर्नाळ येथील रावसाहेब मोहीते वय वर्षे 59, संदेश कदम वय वर्षे 54, अमोल पाटील वय वर्षे 34, राजू पाटील वय वर्षे 44 आणि यांना बॅकअप मॅन म्हणून प्रभाकर आंबोळे वय वर्षे 61 यांनी हा प्रवास एक नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता कर्नाळ येथील ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेऊन सुरु केला होता. दररोज 130 ते 150 किमी सायकल प्रवास करत महारास्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या तीन राज्यांत प्रवास करत हा टप्पा पार केला. 9 मुक्काम करत दहाव्या दिवशी सकाळी 11 वाजता 1360 किमी प्रवास पूर्ण केला. या प्रवासा दरम्यान सांगली जिल्ह्यातील कर्नाटक व तामिळनाडू येथील व्यावसायिक यांनी या पाच जणांचे स्वागतही केले होते.
हा प्रवास यशस्वी करुन हे जिगरबाज शनिवार कर्नाळ येथे आले, यावेळी त्यांचे गावात जल्लोषपूर्ण वातावरणात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांची जीप मधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणांसह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी प्रवासाबद्दल हनुमान मंदीर येथे या सर्वांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. हा सायकल प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केल्याने या ग्रुप ने भविष्यात याहीपेक्षा जास्त अंतराची सायकल मोहीम करताना आलेले आपले अनुभव शेअर केले.