सांगली : सांगली मधील आमदार, खासदारांपासून प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाचे रुग्ण आढळू लागले असले तरी ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांचा जिल्ह्यातील आकडा वाढला. यात सर्वसामान्य जनतेबरोबरच राजकारणी, अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यातील काहीजणांनी कोरोनावर मात करून पुन्हा कामास सुरुवात देखील केली आहे.
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. प्राथमिक लक्षणे दिसल्याने खासदार पाटील यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली होती. सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पाटील यांची प्रकृती उत्तम असल्याने घरीच त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. खासदार पाटील हे गेल्या महिन्यापासून अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत होते, दोन दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्याने खासदार पाटील यांनी कोरोना चाचणी केली होती. सोमवारी रात्री त्यांचा आहवला पॉझिटिव्ह आला आहे. मात्र कोणताच त्रास जाणवत नसल्याने त्यांनी घरीच क्वॉरंटाईन होत, उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच खासदार पाटील यांनी आपली प्रकृती उत्तम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लक्षणं असल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी ,असे आवाहन केले आहे.
भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईला अधिवेशनासाठी गेले असताना विधानभवन मध्ये घेण्यात आलेल्या आमदाराच्या टेस्ट मध्ये पडळकर यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यामुळे पडळकर अधिवेशनात उपस्थित न राहता ते तातडीने सांगली जिल्ह्यातील आटपाडी मधील झरे या गावी येऊन क्वारनटाइन झाले आहेत. त्याना कोणताही त्रास जाणवत नसून तरी देखील खबरदारी म्हणून घरीच उपचार घेत असल्याची माहिती पडळकर यांनी दिलीय. याशिवाय काँगेसचे नेते पृथ्वीराज पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी देखील कोरोनावर मात केली आहे.
विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर हे देखील कोरोना पॉझिटीव्ह होते. तासगावच्या आमदार सुमनताई आर. आर. पाटील, खानापूर-आटपाडीचे मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर, आमदार मोहनराव कदम, जत मतदारसंघाचे काँगेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा यात समावेश आहे. तर सर्वांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. चार दिवसांपूर्वी आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित आर. आर. पाटील आणि आर. आर आबा यांचे बंधू सुरेश पाटील या दोघांना कोरोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी आमदार सुमनताई पाटील यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता. पण शनिवारी पुन्हा तपासणी करण्यात आली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिघांची प्रकृती उत्तम असून सर्व जण पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा सुद्धा कोरोना बाधित झाले आहेत. शर्मा यांना त्रास जाणवत होता, त्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. शर्मा यांचा अहवाल पॉझिटिव आला तर शर्मा यांची प्रकृती स्थिर असून ते होम क्वॉरंटाईन झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत.
कोरोनाचा राजकारण्यांनाही धसका, मंत्र्यांसह काही आमदार, महापौरांना लागण
माजी मंत्री, आमदाराची कोरोनावर मात
काही दिवसांपूर्वी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसात घरीच उपचार घेऊन खोत यांनी कोरोनावर मात केली आणि सदाभाऊनी पावसाळी अधिवेशनाला देखील हजेरी लावली आहे.
दुसरीकडे सांगली विधानसभा आणि मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ , सुरेश खाडे यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी देखील कोरोनावर मात केली मात्र खबरदारी म्हणून दोघांनीही अधिवेशनाला हजेरी लावली नाही. आमदार मोहनराव कदम यानी देखील कोरोनावर मात केलीय.
महत्त्वाच्या बातम्या :
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोना, घरातच विलगीकरण
आयुष मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला