देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. भारत-चीन सीमेवर तणाव वाढवा, लडाखमध्ये एलसीवर घुसखोरी करणाऱ्या चीनला रोखण्यासाठी भारताकडून गोळीबार, सूत्रांची माहिती, तर भारताने धमकावल्याचा चीनचा कांगावा
2. उद्या मुंबईत येताच कंगनाच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का बसण्याची शक्यता, पाली हिलमधील कार्यालयावरही बीएमसीच्या कारवाईची टांगती तलवार
3. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना पाच वेळा जेवण आणि व्हिडीओ कॉलची सुविधा, एबीपी माझाने दूरवस्था दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग
4. कोरोना चाचणीच्या दरात 600 ते 800 रुपयांची कपात, राज्य सरकारचा दिलासा, कमीत कमी 1200 ते जास्तीत जास्त 2000 रुपये मोजावे लागणार
5. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भाई गिरकर आज रिंगणात तर महाविकास आघाडीकडून निलम गोऱ्हे मैदानात, चुरसीच्या लढतीची उत्सुकता शिगेला
6. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या पतीला अटक, ईडीची कारवाई, दीपक कोचर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह भ्रष्टाचाराचा आरोप
7. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरुप यांचे पुण्यात निधन, वयाच्या 91 व्या वर्षी रुबी हॉल रुग्णालयात अखेरचा श्वास
8. नवी मुंबईत मनसेकडून मनपा आरोग्य अधिकाऱ्याचा यमदूत पुरस्कार देऊन सन्मान, कोरोनाचे बळी थांबत नसल्याने अनोखं आंदोलन
9. बहिण प्रियंकाने पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनवरील गोळ्या घेतल्यानंतर पाच दिवसांनी सुशांतचा मृत्यू, रिया चक्रवर्तीचा गंभीर आरोप, वांद्रे पोलिसात तक्रार दाखल
10. अभिनेता प्रभासचा दिलदारपणा, जीन ट्रेनर लक्ष्मण रेड्डीला 73 लाखांची आलिशान रेंज रोव्हर एसयूव्ही कार भेट