मुंबई : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत सातारच्या जवान वीरमरण आलं आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना संदीप सावंत शहीद झाले. शहीद संदीप सावंत यांचं मुळ गाव कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवाशी आहे. संदीप यांचा दीड वर्षापूर्वीच विवाह झाला होता. त्यांना अवघ्या दोन महिन्यांची मुलगी आहे. संदीप सावंत शहीद झाल्याची बातमी कळताच संपूर्ण मुंडे गावावर शोककळा पसरली आहे.
जम्मू काश्मीर येथे चकमकीत शहीद झालेले जवान संदिप रघूनाथ सावंत हे मुळचे साताऱ्यातील कराड येथील मुंडे गावचे रहिवाशी आहेत. संदिप सावंत यांचे मोठे भाऊ शशिकांत सावंत यांना सकाळी दहा वाजता फोन आला आणि संदिप सावंत यांना सीमेवर लढताना तीन ते चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांच्या शशिकांत यांनी संदिप यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर शशिकांत यांनी माहिती मिळवली तेव्हा सुरज यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचे भाऊ संदिप हे शहिद झाल्याचे त्यांना समजले. संदिप यांना अवघ्या दोन महिन्याची मुलगी रिया आहे.
दहशतवाद्यांशी लढताना साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 2020 10:23 PM (IST)
जम्मू काश्मीर येथे चकमकीत शहीद झालेले जवान संदिप रघूनाथ सावंत हे मुळचे साताऱ्यातील कराड येथील मुंडे गावचे रहिवाशी आहेत. संदिप सावंत यांचे मोठे भाऊ शशिकांत सावंत यांना सकाळी दहा वाजता फोन आला आणि संदिप सावंत यांना सीमेवर लढताना तीन ते चार गोळ्या लागल्या असल्याची माहिती देण्यात आली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -