शिर्डी : शिर्डीच्या साई समाधी मंदिराच्या देणगीत मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटींची वाढ झाली आहे. यंदा साई चरणी तब्बल 290 कोटींच्या रकमेचे दान प्राप्त झाले असून ऑनलाइन, डेबीट व क्रेडीट कार्डच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या देणग्यांमध्येही लक्षणीय वाढ आहे. जानेवारी ते डिसेंबर 2018 या वर्षापेक्षा 2019 या वर्षात यंदा साई चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीमध्ये तीन कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. साईबाबांच्या चरणी 2019 या सरत्या वर्षभरात सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक भाविक नतमस्तक झाले आहे.


जानेवारी ते डिसेंबर 2019 या वर्षात साईंच्या दक्षिणा पेटीत 156 कोटी 49 लाख 2 हजार 350 रुपयांचे गुप्तदान झाले आहे. देणगी काउंटवर 60 कोटी 84 लाख 8 हजार 590 रुपयांचे दान करण्यात आले आहे. धनादेश स्वरूपात 23 कोटी 35 लाख 90 हजार 409 रुपये दान आले आहे. मनीऑर्डरच्या स्वरूपात 2 कोटी 17 लाख 83 हजार 515 रुपये, डेबिट-क्रेडिट कार्डद्वारे 17 कोटी 59 लाख 11 हजार 424 रुपये आणि ऑनलाईन देणगीद्वारे 16 कोटी 2 लाख 51 हजार 606 रुपये दान जमा झाले आहे. या व्यतिरिक्त संस्थानला यंदाच्या वर्षी 19 किलो सोने आणि 757.470 ग्रॅम चांदी दान स्वरूपात मिळाल्याच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितल आहे.

Sai Baba Temple | साई दर्शनाने नव्या वर्षाची सुरुवात, साई मंदिरात मध्यरात्रीपासून भक्तांची गर्दी | ABP Majha



दरम्यान कालच साईबाबांना दिल्ली येथील भक्त रक्षा शर्मा यांनी तब्बल 30 तोळे सोन्याने मढविलेला सुमारे साडेबारा लाख रुपये किंमतीचा शंख साईचरणी अर्पण केला आहे. अगोदरच साई मंदिराचा गाभारा आणि कळस सोन्याचा आहे. आरती, अभिषेक, मंगलस्नान आदी पूजेच्यावेळी वापरात येणारे सर्व साहित्य सोन्याचे आहे. मंगलस्नानासाठी वापरात येणारा शंखच बाकी होता. आता तो देखील सोन्याचा झाला आहे. 'आम्हाला जे मिळालं आहे ते बाबांच्या कृपेनेच मिळालं आहे, बाबांना एका हाताने दिलं ते दहा हातांनी परत देतात' अशी भावना भाविकांची आहे.

साईबाबा संस्थानच्या तिजोरीत 2300 कोटी रोख रक्कम जी वेगवेळ्या बँकेत डीपॉझीट आहे. तर 454 किलो सोने आणि 5 हजार 553 किलो चांदी जमा आहे.

संबंधित बातम्या : 
New Year 2020 | देवदर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर भाविकांनी फुललं