🎉 एबीपी माझाच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉


एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 जानेवारी 2020 | बुधवार

1. खातेवाटपावर चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच, दोन महत्वांच्या खात्यासाठी काँग्रेस आग्रही, तर मतभेद नसल्याचा राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा दावा https://bit.ly/39tOxll

2. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेनेचे डझनभर आमदार नाराज, सर्वजण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, तर उद्धव ठाकरे आणि तानाजी सावंतांमध्ये वाद झाल्याचीही माहिती https://bit.ly/359BfXK

3. काँग्रेस भवनातील तोडफोडीशी माझा संबंध नाही, आमदार संग्राम थोपटेंची प्रतिक्रिया तर राडा घालणाऱ्यांवर काँग्रेसकडून अद्यापही कुणावर कारवाई नाही https://bit.ly/2sBUFY5

4. आता मातोश्रीवरून आदेश येत नाहीत, दिल्लीच्या 'मातोश्री' आदेश देतात, पालघरच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल https://bit.ly/2Qfc1Di

5. भाजपपासून सावध राहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नवीन मंत्र्यांना सूचना, तुम्ही मंत्री आहात तर मंत्र्यांसारखे वागा, अजित पवारांचा सल्ला, भाजपशी निपटण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचा दावा https://bit.ly/36fbOWf

6. कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभ अभिवादनासाठी गर्दी, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवलेंकडून अभिवादन, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त https://bit.ly/35g6NeG

7. विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 19 रुपयांची वाढ, तर मेल आणि एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात आजपासून वाढ, तर रेल्वेची भाडेवाढ लोकल प्रवासाला लागू नाही https://bit.ly/39x5r2f

8. विजय मल्ल्याची जप्त संपत्ती लिलावाद्वारे विकून कर्जाची रक्कम वसूल करा; मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय https://bit.ly/2ZFetFW

9. दारु पिऊन नववर्षाचं स्वागत करणं अनेकांना महागात, नागपुरात 600 तळीरामांची वाहनं जप्त तर नाशिकमध्येही 200 तर मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी कारवाई https://bit.ly/2sBblyM

10. नववर्षाचं सर्वत्र जल्लोषात स्वागत, देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात करण्याचा नवा ट्रेंड, शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूर, गणपतीपुळे भाविकांनी फुललं https://bit.ly/2QAjTOy

विशेष वृत्त - New Year 2020 | नवीन वर्ष, नवीन नियम; वाचा आजपासून काय-काय बदलणार? :- https://bit.ly/2SI7sTq

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK