- मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत झालेल्या आंदोलने आणि मोर्चांमध्ये अनेक समाज बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्यात यावे.
- पोलिसांकडून होत असलेली दडपशाही थांबवावी.
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेतीमालास हमीभाव द्यावा.
- स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात.
- शैक्षणिक शुल्कामध्ये सरसकट सवलत मिळावी.
- दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
- शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी.
संवाद यात्रा विधानभवनावर धडकणार, कार्यकर्त्यांची धरपकड सुरु
एबीपी माझा वेब टीम | 26 Nov 2018 09:17 AM (IST)
मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आयोजित करण्यात आलेली संवाद यात्रा आज मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. त्याआधीच मराठा बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आयोजित करण्यात आलेली संवाद यात्रा आज मुंबईत विधानभवनावर धडकणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्यांची गंभीर दखल घेत त्याचे कायद्यात रुपांतर करण्याची मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान संवाद यात्रा मुंबईत पोहोचण्याआधीच मराठा बांधवांची पोलिसांकडून धरपकड सुरु झाली आहे. पुण्यातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मराठा संवाद यात्रा विधानभवनावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड सुरु केल्यामुळे गोंधळ उडाला आहे. पुण्यासह राज्यात अन्य ठिकाणीही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पुणे, अहमदनगर, सांगली, नाशिक, औरंगाबाद, परभणी, जालना, सिंधुदुर्ग अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा समाज बांधव आज मुंबईत येणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी, सरकारच्या आश्वासनात स्पष्टता नसल्याने आरक्षणाविषयी सांशकता कायम असल्याचं मोर्चेकऱ्यांनी म्हणणे आहे. आज विधानभवनावर धडकणाऱ्या संवाद यात्रेच्या माध्यमातून विविध मागण्या मांडल्या जाणार आहेत. काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?