नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह रविवारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची पुण्यात भेट घेणार आहेत. संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत रविवारी रात्री आठ वाजता पुरंदरे वाड्यात ही भेट होणार आहे.
दरम्यान, या भेटीपूर्वी अमित शाह दुपारी दोन वाजता पुण्यातील नाना पेठेत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचंही दर्शन घेणार आहेत.
संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत अमित शाह आणि भाजपचे केंद्रातील मंत्री देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या भेटी घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी मुंबईत अभिनेत्री माधुरी दीक्षित, उद्योगपती रतन टाटा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
काय आहे संपर्क फॉर समर्थन?
भाजपकडून एनडीएतील मित्रपक्षाच्या नेत्यांचीही भेट घेतली जात आहे. हे अभियान म्हणजे संघाने भाजपला दिलेला कानमंत्र आहे. इंग्लंडमध्ये मजूर पक्षाने आपल्या कामगिरीचं परीक्षण करण्यासाठी लिस्टन टू ब्रिटन्स किंवा लेबर पार्टी लिसन्सचा ऐतिहासिक प्रयोग केला होता. त्याच धर्तीवर देशाच्या विविध क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठी त्यांना अगदी घरी जाऊन भेटायचं, त्यांची सरकारबद्दलची मतं जाणून घ्यायची, असा हा कार्यक्रम आहे. सध्या बौद्धिक वर्तुळात सरकारची जी निगेटिव्ह प्रतिमा बनत चाललीय ती पुसून काढण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आपल्या पक्षाला, आपल्या विचारसरणीला कशी सर्व स्तरांमध्ये स्वीकृती आहे, हे दाखवण्याचाच हा प्रयत्न.
अमित शाह पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंना भेटणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2018 09:46 PM (IST)
संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत रविवारी रात्री आठ वाजता पुरंदरे वाड्यात ही भेट होणार आहे. या भेटीपूर्वी अमित शाह दुपारी दोन वाजता पुण्यातील नाना पेठेत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचंही दर्शन घेणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -