मुंबई : 'छडी लागे छम छम विद्या येई घम घम' असं म्हंटलं जायचं. शिक्षकाच्या हातात छडी पाहिली तरीही विद्यार्थी घाबरतात. मात्र आता शाळेतून ही छडीची शिक्षा बंद होणार आहे. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने याबाबत आदेश जारी केला आहे.
शिक्षण बाल हक्क कायद्यानुसार कोणत्याही मुलाला शारीरिक किंवा मानसिक छळाला सोमोरे जाऊ नये अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता राष्ट्रीय बालहक्क आयोगाने शाळांमध्ये छडीची शिक्षा वगळण्याबाबत निर्णय घेतला.
याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सूचना केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना सर्व माध्यमांना, शाळांना, व्यवस्थापन संस्थांना देण्यात आल्या असून, याबाबत कार्यशाळा घेण्याचं देखील राष्ट्रीय बालहक्क आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.