मुंबई : मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.  सुट्टीकालीन कोर्टात ही याचिका दाखल केली आहे.  आज दुपारी 2:30 वाजता यावर सुनावणी  होणार आहे. 


आर्यन खान ड्रग्स प्रकरणी खंडणी मागितल्याचा आरोप असलेले IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती अरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीनं सुनावणीची मागणी केली  होती. वानखेडेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य झाली असून  आज दुपारी 2:30 वाजता सुनावणी  होणार आहे.  विधिज्ञ रिझवान मर्चंट, आबाद पोंडा मांडणार वानखेडे यांची बाजू मांडणार आहे. CBIचे वकीलही यावेळी युक्तिवाद करणार आहेत. 


दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार समीर वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.   तब्बल 19 महिन्यांनंतर आर्यन खान ड्रग प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आर्यन हा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा असल्यानं प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. दरम्यान दिल्ली सीबीआय अधिकाऱ्यांची टीम मुंबईत दाखल झाल्यानं या प्रकरणातील गांभीर्य अधिक वाढलं आहे. तत्कालीन मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआयच्या रडारवर आहेत. वानखेडेंविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल करून धाडलंय चौकशीसाठी समन्स धाडले आहे.


वानखेडेंच्या निवासस्थानी सीबीआयचा छापा


सीबीआयने (CBI) काही दिवसांपूर्वी समीर वानखेडेंच्या गोरेगावच्या घरी छापा टाकला होता. तेव्हाच समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरचा मोबाईलही जप्त करण्यात आला. समीर वानखेडेंची चौकशी झाल्यानंतर विश्वविजय सिंग, आशिष रंजन यांनाही सीबीआय चौकशीसाठी समन्स बजावणार आहे.


काय आहे आर्यन खान प्रकरण?


एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. 


एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचा एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता. 


आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. त्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली.