मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्याविरोधात रोष निर्माण होत आहे. त्यातच आता संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनी देखील संताप व्यक्त केलाय. अबू आझमी यांना महाराष्ट्राबाहेर फेकलं पाहिजे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
औरंगजेब बादशाह हा वाईट माणूस नव्हता, त्याचा खोटा इतिहास दाखवला जात असून खरा इतिहास दाखवला तर हिंदू समाज देखील तो मान्य करतील, असं वक्तव्य आझमी यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरून संभाजीराजे यांनी जोरदार टीका केली आहे.
काय म्हटले आहे संभाजीराजे यांनी?
औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही." असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केलाय. या ट्विटमध्ये त्यांनी अबू आझमी महाराष्ट्रात का राहतायत? असा सवाल देखील केला आहे. अशा व्यक्तीला सर्वात आधी महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे, त्यांची असं बोलण्याची हिम्मत कशी होते? अशी टीका संभाजीराजे यांनी केलीय.
काय म्हटले होते अबू आझमी यांनी?
"औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. अनेक लोकांची नावे औरंगजेब आहेत. औरंगाबादमध्ये देखील औरंगजेब अशी नावे आहेत. 36 जिल्ह्यांत तीन नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद अशी मुस्लिम आहेत. या तीन जिल्ह्यांची नावे बदलल्याने कोणाला नोकरी मिळणार नाही, महागाई कमी होत नाही. जिल्ह्यांची नावे बदलून तरुणांना नोकरी मिळत असेल तर नाव बदलल्याचे स्वागत करेन" असे आझमी यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या