मुंबईः कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा समाजाचे विराट मोर्चे निघू लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं आहे. मराठा समाजाचे प्रश्न सगळे मिळून एकत्रितपणे सोडवू शकतो. त्यासाठी प्रतिमोर्चे काढण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चा तसेच अन्य मुद्द्यांवर दूरदर्शनला मुलाखत दिली. या मुलाखतीचा अगदी अल्प भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता 'एबीपी माझा'वर ही संपूर्ण मुलाखत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सामाजिक प्रश्न एकत्रितपणे याअगोदरही सोडविण्यात आले आहेत. यावेळीही सर्व समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन मागणीवर चर्चा करण्याची गरज आहे, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.